शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

बाजारातील ओट्यांचे काम पूर्ण; पण लिलाव अडले

By admin | Updated: January 26, 2017 02:07 IST

येथे बाजाराकरिता ११ ओटे बनविण्यात आले. याला एक वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटला. अद्याप या

दुर्लक्ष : नागरिकांकडून ओट्यांचा वापर वैयक्तिक कामासाठी सेवाग्राम : येथे बाजाराकरिता ११ ओटे बनविण्यात आले. याला एक वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटला. अद्याप या ओट्यांचा लिलाव करण्यात आला नाही. याला ग्रामपंचायतीचे उदासीन धोरण कारणीभूत ठरत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. येथील जुन्या वस्तीतील नांदोरा मार्गावर जिल्हा वार्षिक जनसुविधा योजना अंतर्गत बाजार ओटे आणि नालीचे बांधकाम करण्यात आले. याचे भूमिपूजन २०१४ मध्ये करण्यात आले. तसा फलक येथे लावण्यात आला. प्रत्यक्षात वर्षभरापूर्वी निर्माण कार्य सुरू झाल्याची माहिती आहे. ओट्याचे निर्माण कार्य पूर्ण झाल्यावर ते वापरात येणे गरजेचे होते. मात्र लिलाव झाले नसल्याने ओटे तसेच रिकामे पडून आहे. येथे ओटे बांधकाम सुरू असताना परिसरातील नागरिकांनी याला विरोध दर्शविला होता. जुन्या वस्तीऐवजी आश्रम मार्गावर ओटे बांधण्यात यावे, अशी मागणी केली होती. संबंधितांनी नागरिकांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केले. नागरिकांच्या घरासमोर ओटे बांधण्यात आले. अद्याप ते वापरात आलेले नाही. भविष्यात या ओट्यांचा त्रास परिसरातील रहिवाशांना होईल, असे दिसून येते. त्यामुळे याला विरोध दर्शविण्यात आला. या मार्गावर पेव्हर ब्लॉक लावून सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या कामाला कधी सुरूवात यआकडे म्रहिवाशांचे लक्ष लागले आहे.(वार्ताहर) घरातील वाळवणही बाजार ओट्यावर ४जुन्या वस्तीतील मुख्य आणि नांदोरा मार्गावर बाजार ओटे बांधण्यात आले. हे ओटे गावाच्या दर्शनी भागात आहेत. त्याचा लिलाव करण्यात आला नाही. ज्या नागरिकांच्या घरासमोर हे ओटे आहे ते याचा वापर घरातील वाळवण व इंधन ठेवण्याकरिता करीत असल्याचे दिसते.