शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

मास्क न वापरणाऱ्यांकडून वसूल केला २.५४ लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2020 5:00 AM

अनेक देशात कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे पुन्हा लोकडाऊन करावे लागले आहे. हिच परिस्थिती वर्धा जिल्ह्यावर ओढावू नये म्हणून सध्या जिल्हा प्रशासनाच्यावतीने खबरदाराच्या उपायांची प्रभावी अंमलबजाणी केली जात आहे. नियमित मास्कचा वापर हा कोरोनावर प्रभावी खबरदारीचा उपाय आहे. परंतु, सण व उत्सवादरम्यान बाजारपेठेत गर्दी होत असताना अनेक नागरिक मास्कचा वापर करीत नसल्याचे लक्षात आल्याने जिल्हा प्रशासनाने ह्यमिशन मास्कह्ण ही मोहीम हाती घेतली आहे.

ठळक मुद्देह्यमिशन मास्कह्ण मोहीम क काही ठिकाणी झाला सामूहिक शपथविधी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात सध्या सण व उत्सवांच्या पार्श्वभूमीवर माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमाचा एक भाग म्हणून जिल्हा प्रशासनाकडून ह्यमिशन मास्कह्ण ही त्रि-दिवसीय मोहीम राबविली जात आहे. याच मोहिमेदरम्यान विशेष पथकांनी मास्कचा वापर न करणाऱ्यांकडून तब्बल २ लाख ५३ हजारांचा दंड वसूल केला आहे. तर काही ठिकाणी बेशिस्तांना त्यांची चूक लक्षात आणून देण्यासाठी ह्यमी घराबाहेर पडल्यावर नेहमीच मास्कचा वापर करेलह्ण अशी शपथ देण्यात आली.अनेक देशात कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे पुन्हा लोकडाऊन करावे लागले आहे. हिच परिस्थिती वर्धा जिल्ह्यावर ओढावू नये म्हणून सध्या जिल्हा प्रशासनाच्यावतीने खबरदाराच्या उपायांची प्रभावी अंमलबजाणी केली जात आहे. नियमित मास्कचा वापर हा कोरोनावर प्रभावी खबरदारीचा उपाय आहे. परंतु, सण व उत्सवादरम्यान बाजारपेठेत गर्दी होत असताना अनेक नागरिक मास्कचा वापर करीत नसल्याचे लक्षात आल्याने जिल्हा प्रशासनाने ह्यमिशन मास्कह्ण ही मोहीम हाती घेतली आहे. यात आतापर्यंत मास्क न वापरणाऱ्या लोकांना २ लाख ५४ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर काही ठिकाणी बेशिस्तांना शिस्त लावण्यासाठी सामूहिक शपथ देण्याचा अभिनव प्रयोगही करण्यात आला. एकूणच या मोहिमेच्या माध्यमातून मास्कचा वापर करणे, नियमित हात धुणे आदी विषयाची माहिती नागरिकांना देत त्यावर प्रभावी जनजागृतीही करण्यात आली, हे विषेश.१२७ व्यावसायिकांना ठोठावला दंडअनेक दुकानात कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी सांगितलेल्या उपाय योजनांची अंमलबजावणी केली जात नसल्यामुळे अशा दुकानांवर सध्या दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. शुक्रवारी सायंकाळी उशीरापर्यंत तब्बल १२७ दुकानदारांवर शारीरिक अंतर न ठेवणे, मास्कचा वापर न करणे आणि हात धुण्यासाठी व्यवस्था न उभारणे यासाठी दंडात्मक कारवाई करण्यात आली.शिवछत्रपतींना साक्षी ठेवून घेतली शपथजिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी हिंगणघाट येथे बाजारात प्रत्यक्ष पाहणी करून मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. तर पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर आणि उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे यांनी वर्धा शहरातील मुख्य बाजारपेठेत बेशिस्तांवर दंडात्मक कारवाई केली. तसेच वर्धा नगर परिषदेचे मुख्याधिकारी विपीन पालिवाल यांनी वर्धा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात स्वत: हजर राहून बेशिस्तांच्या मुसक्या आवळल्या. यावेळी मास्कचा वापर न करताना आढळून आलेल्या ३६ व्यक्तींना शिवछत्रपतींच्या साक्षीने ह्यमी घराबाहेर पडल्यावर नेहमीच मास्कचा वापर करेलह्ण अशा आशयाची शपथ देण्यात आली.चार विभाग करताहेत धडक कारवाईजिल्हा प्रशासनातील महसूल, पोलीस, ग्रामविकास आणि नगरविकास विभागाचे पथक ही मोहीम राबवित आहेत. यामध्ये महसूल विभागाच्या ३७ पथकांनी मास्कचा वापर न करणाऱ्या १४७ नागरिक, पोलीस विभागाने १९ पथकाच्या सहाय्याने ३९५ व्यक्तींवर, ग्रामविकास विभागाने ५३ पथकाच्या माध्यमातून ३३७ व्यक्ती तर नगरविकास विभागाने २२ पथकाद्वारे ३५७ व्यक्ती अशा एकूण १ हजार २३३ व्यक्तींवर कारवाई केली आहे. या कारवाईमुळे बेशिस्तांमध्ये खळबळ उडाली आहे.अन् आता वाहनही होणार जप्तवारंवार सूचना देऊनही अनेक नागरिक मास्कचा वापर करीत नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा बेशिस्तांना धडा शिकविण्यासाठी आता मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तीचे वाहनच एक दिवसांकरिता जप्त केले जाणार आहे. त्याची नोंद घेतली जाणार आहे.सध्या जिल्ह्यात कोरोनाची स्थिती आटोक्यात आहे. मात्र, लोकांच्या मनातील कोरोनाची भीती नाहीशी होऊन लोक मास्क न वापरता बाहेर गर्दीच्या ठिकाणी बिनधास्तपणे वावरताना आढळून येत आहेत. नागरिकांचा असा निष्काळजीपणा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे नागरिकांनी आरोग्य विभागाने सांगितलेल्या सूचनांचे पालन करावे.- विवेक भीमनवार, जिल्हाधिकारी, वर्धा.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या