शहरं
Join us  
Trending Stories
1
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
2
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
3
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
4
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
5
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
6
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
7
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
8
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
9
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
10
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
11
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
12
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
13
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
14
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी
15
शालार्थ आयडी घोटाळा : छत्रपती संभाजीनगर बोर्डाच्या सचिव वैशाली जामदार यांना अटक
16
नागपुरात वासनांधाने ओलांडली विकृतीची सीमा, घोड्यासोबत अनैसर्गिक कृत्य
17
'मला पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न केले', धर्मरावबाबा आत्राम यांचा राष्ट्रवादीच्या मेळाव्यातच आरोप
18
“ते हत्यार शोधून…” वैष्णवी हगवणे प्रकरणात वकिलांकडून मोठी अपडेट
19
'...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा
20
नागपूर शहरातील सराफा आणि हवाला व्यावसायिकांवर ईडीचे छापे, लखोटियांना घेतलं ताब्यात

शासकीय विश्रामगृहाकरिता फर्निचर खरेदीचा मुहूर्तच सापडेना!

By admin | Updated: September 23, 2016 02:23 IST

यवतमाळकडे जाणाऱ्या महामार्गावरून सहज लक्ष वेधून घेणारी येथील शासकीय विश्रामर्गहाची वास्तू गत एक वर्षापासून लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहे.

लोकार्पण थांबले : बांधकाम विभागाची कार्यपद्धती चव्हाट्यावरहरिदास ढोक  देवळी यवतमाळकडे जाणाऱ्या महामार्गावरून सहज लक्ष वेधून घेणारी येथील शासकीय विश्रामर्गहाची वास्तू गत एक वर्षापासून लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहे. अडीच कोटींच्या खर्चातून ही वास्तू पूर्णत्वास आली. अंतर्गत विद्युतीकरण तसेच पाणी पुरवठ्यासारखी महत्त्वाची कामे सुद्धा पूर्ण झालीत; परंतु या वास्तूसाठी साजेशा व शोभेल अशा फर्निचरच्या खरेदीचा मुर्हूतच निघत नसल्याने, लोकार्पण अडल्याचे दिसून आले आहे. यामुळे बांधकाम विभागाची कार्यपद्धती चव्हाट्यावर आली आहे.औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांचे जाळे, तालुक्याचे ठिकाण तसेच महामार्गावर धावणाऱ्यांची गरज लक्षात घेवून देवळी येथे सुसज्ज विश्रामगृहाची आवश्यकता विषद करण्यात आली. त्यानुसार सर्व सोपस्कर पूर्ण करून वास्तू बांधकामाला गती देण्यात आली. एक वर्षांच्या कालावधीत ही वास्तू पूर्ण करण्यात आली. यानंतरचे एक वर्ष फक्त फर्निचरची वाट पाहण्यात गेले. या दरम्यानच्या गत दोन वर्षांत जुने विश्रामगृह बंद पडल्याने अधिकाऱ्यांच्या बैठका तसेच महत्त्वपूर्ण व्यक्तींच्या निवास व्यवस्थेला चाप बसला. विश्रामगृह वास्तूचा तळमजला व पहिला मजला अशा पद्धतीने बांधकाम करण्यात आले. अति महत्त्वाच्या (व्ही.व्ही.आय.पी.) व्यक्तींसाठी एक कक्ष, महत्त्वाचे (व्ही.आय.पी.) व्यक्तींसाठी दोन कक्ष तसेच सर्वसाधारण व्यक्तींसाठी दोन कक्ष असे पाच कक्ष उभारण्यात आले. यासोबतच भोजन व मिटींग कक्षाची व्यवस्था करून वास्तूला अद्यावत केले. तळमजला व पहिला मजला यासाठी २२ लाखांच्या फर्निचरचे नियोजन करण्यात आले.