शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

बांगडी निर्र्मितीतून महिलांना आर्थिक बळ

By admin | Updated: April 8, 2017 00:32 IST

ग्रामीण भागातील महिलांची चिकाटी व ध्येय याची सांगड घालत एका स्वयंमसेवी संस्थेने बांगडी निर्मितीतून महिलांना रोजगार उपलब्ध करुन दिला.

रोजगाराच्या नव्या वाटा : स्वयंसेवी संस्थाच्या पुढाकारातून महिलांना प्रशिक्षण अरविंद काकडे   आकोली ग्रामीण भागातील महिलांची चिकाटी व ध्येय याची सांगड घालत एका स्वयंमसेवी संस्थेने बांगडी निर्मितीतून महिलांना रोजगार उपलब्ध करुन दिला. या नाविण्यपूर्ण उपक्रमातील महिलांचे यश पाहुन गावातील अन्य महिलांनी प्रेरणा घेत त्या बांगडी निर्मिती व्यवसायाकडे वळत आहे. ग्रामीण भागात शेतमजुरीशिवाय रोजगाराचा अन्य पर्याय नाही. पण खडकी (आमगाव) येथील महिलांनी रोजगाराची नवी वाट चोखंदळत आर्थिक सबलीकरणाकडे वाटचाल सुरू केली आहे. जंगलव्याप्त भागात लाख उपलब्ध होते. यापासून बांगडी निर्मिती करण्याची कल्पना महिलांना वनपरिक्षेत्र अधिकारी पि.एम. वाडे यांनी दिली. महिलांनी प्रशिक्षण घेऊन स्वत:चा व्यवसाय सुरू करावा म्हणून त्यांना प्रेरित केले. स्वयंसेवी संस्थेने यात पुढाकार घेत गावातील दहा महिलांची प्रशिक्षणासाठी निवड केली. गिरड येथे प्रशिक्षण घेतल्यावर दोन महिलांचा एक गट तयार केला. घरबसल्या महिलांना बांगडी निर्मित करण्याचे उद्दीष्ट दिले. महिलांनी सुरू केलेल्या नाविण्यपूर्ण व्यवसायाकडे ग्रामस्थ कुतुहलाने पाहत. महिलांनी न डगमगता आपले कार्य सुरू ठेवले. क्षेत्र सहाय्यक नरेश वाघमारे यांनी वेळोवेळी महिलांना मार्गदर्शन केले. तर कच्चा माल स्वयंसेवी संस्थेने उपलब्ध करुन दिला. गटातील एक महिला दिवसाला ४०-६० बांगड्या तयार करते. ५ रुपये दराने स्वयंसेवी संस्था बांगड्यांची खरेदी करते. त्यामुळे महिलांना २५० ते ३०० रुपये रोज घरबसल्या मिळतो. उन्हाळ्यात कष्टाची शेतीकाम करण्यापेक्षा बांगडीनिर्मिती व्यवसायात महिलांना चांगली मिळकत होत आहे. बांगडी निर्मितीतील महत्त्वाचा घटक लाख असून स्थानिक पातळीवर लाख उपलब्ध व्हावी म्हणून वनविभाग प्रयत्न करीत आहे. जंगलव्याप्त भागातील गावात रोजगार निर्मितीचे वनविभागाचे ध्येय असून या माध्यमातून महिलांना मोफत प्रशिक्षण देण्यात आले. दिवसाला लाखेपासून ५० बांगड्या तयार करतो. यातून २५० ते ३०० रुपये मिळतात. बांगड्यांची विक्री करण्यासाठी आम्हाला बाजारपेठ शोधावी लागत नाही. संस्थाच त्या खरेदी करीत असल्याने घरबसल्या रोजगार मिळाला. - लक्ष्मी पंधराम, महिला खडकी