अमोल सोटे ।लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (श.): बेलोरा येथील नऊ शेतकºयांनी जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या बळावर तळपत्या उन्हात कलिंगडाची शेती फुलविली. व्यापाºयांना शेतमाल न देता अगदी स्वस्त दरात घरपोच विकला. ऐन कोरोनाच्या संकटकाळात आर्थिक प्रगती साधणाºया शेतकºयांनी या निमित्ताने नवा आदर्श निर्माण केला आहे.अप्पर वर्धा धरणाच्या पायथ्याशी बेलोरा (बुजरूक) गाव वसले आहे. वर्धा नदीपात्राला लागून सुपीक शेती आहे. येथील शेतकरी वीरेंद्र जाणे, उमेश जाणे, अरुण जाणे, मधुकर जाणे, नकुल जाणे, हरिदास बोरवार, अजय जाणे, प्रमोद जाणे, हुकूम जाणे या नऊ जणांनी प्रत्येकी एक एकर याप्रमाणे नऊ एकरात कलिंगडाचे उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला. शेतीची मशागत करीत लागवड केली. उत्पन्न आल्यावर व्यापारी गावात आले. त्यांनी पाच रुपये या कवडीमोल भावात कलिंगड मागितले. मात्र, शेतकºयांनी कोरोनामुळे गेल्या पावणेदोन महिन्यांपासून घरीच असलेल्या आष्टी तालुक्यातील नागरिकांना अवघ्या दहा रुपये किलोने कलिंगड विकायचे ठरविले. यासाठी एकूण १८ जणांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करीत मालवाहू गाडीच्या कलिंगड नेले. सहाय्याने सोशल डिस्टन्सिंग पाळून घरोघरी कलिंगडची विक्री केली. नागरिकांनी ३० रुपये किलोचे कलिंगड अवघ्या १० रुपयांना मिळत असल्याने नागरिकांनी खरेदीला पसंती दिली. त्यामधून लागवडीचा खर्चही निघाला, शिवाय आर्थिक प्रगती साधण्याचा प्रयत्न केला. गावातील तरूणांना रोजगारसुद्धा दिला. या शेतकºयांना परवाना देण्यासाठी प्रा. रवींद्र जाणे, सरपंच मिलिंद जाणे, ग्रामसेविका भाग्यशाली गवई यांनी सहकार्य केले.सोशल मीडियाचा वापरतालुक्यात कोणत्या दिवशी कुण्या गावात जायचे, यासाठी व्हॉट्सअॅपवर ग्रुप तयार करून संदेशवहन करण्यात आले. माहिती असल्याने कलिंगडाची गाडी घरासमोर लावताच ते खरेदी केले. याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. बेलोरा पॅटर्न यशस्वी झाल्याने बाकी शेतकºयांनी आदर्श घेऊन स्वत:च माल विक्रीचे जाळे उभारावे, असे कलिंगड उत्पादक शेतकºयांनी सांगितले.
घरपोच कलिंगड विकून साधली आर्थिक प्रगती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 05:00 IST
अप्पर वर्धा धरणाच्या पायथ्याशी बेलोरा (बुजरूक) गाव वसले आहे. वर्धा नदीपात्राला लागून सुपीक शेती आहे. येथील शेतकरी वीरेंद्र जाणे, उमेश जाणे, अरुण जाणे, मधुकर जाणे, नकुल जाणे, हरिदास बोरवार, अजय जाणे, प्रमोद जाणे, हुकूम जाणे या नऊ जणांनी प्रत्येकी एक एकर याप्रमाणे नऊ एकरात कलिंगडाचे उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला. शेतीची मशागत करीत लागवड केली. उत्पन्न आल्यावर व्यापारी गावात आले.
घरपोच कलिंगड विकून साधली आर्थिक प्रगती
ठळक मुद्देबेलोऱ्यातील नऊ शेतकऱ्यांचा प्रयोग : दलालांना माल देण्याचा प्रस्ताव नाकारला