विचारणा करण्याकरिता आलेल्या एसटी प्रवाशाला शिवीगाळ केल्याचे प्रकरण वर्धा : विचारणा करण्यात आलेल्या प्रवाश्यांशी उद्धट भाषा वापरण्याचा व्हिडिओ वायरल झाला. ही बाब गांर्भियाने घेत राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सदर महिला कर्मचाऱ्याला शनिवारी निलंबित केले. वायरल झालेल्या व्हिडिओची तपासणी विभागाचे अधिकारी करीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गत १५ दिवसांपासून येथील परिवहन विभागाच्या एका महिलेने विचारणा करण्याकरिता आलेल्या प्रवाशाला शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ वायरल झाला. हा व्हिडीओ परिवहन महामंडळच्या नियंत्रकांपर्यंत पोहचला. त्यांनी या विषयाला गांभीर्याने घेत चौकशी विभागातील सदर महिलेला निलंबित केले. या महिलेचे नाव रेखा ढेंगरे असे असल्याचे असल्याचे विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. या महिलेवर तीन महिन्यांसाठी निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे. सोबतच या व्हिडिओची तपासणी होत आहे. व्हिडीओत शिवीगाळ व उद्धटपणा आढल्यास अधिक कडक कार्यवाहीचे संकेत सहायक निरीक्षक रत्नाकर नंदनवार यांनी दिले. नंदनवार यांनी सांगितले की, महिला कर्मचारी यांना आपली बाजू मांडण्याची मुभा देण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)
अखेर ‘ती’ महिला कर्मचारी निलंबित
By admin | Updated: April 5, 2017 00:33 IST