शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर विकास चौकाने घेतला मोकळा श्वास

By admin | Updated: July 28, 2016 00:28 IST

येथून बोरधरणकडे जाणाऱ्या रस्त्यावरील विकास चौकात अनेक पानटपरी चालकांनी शासकीय जागेत अतिक्रमण केले होते.

पोलीस बंदोबस्तात बांधकाम विभागाची कारवाई सेलू : येथून बोरधरणकडे जाणाऱ्या रस्त्यावरील विकास चौकात अनेक पानटपरी चालकांनी शासकीय जागेत अतिक्रमण केले होते. या चौकातून वाहनधारकांना कसरत करावी लागत होती. अखेर बांधकाम विभागाने पुढाकार घेत बुधवारी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटविले. यामुळे विकास चौकाने मोकळा श्वास घेतला. येथील विकास चौकात तहसील कार्यालय, पाटबंधारे विभाग, पंचायत समिती, वीज वितरण कार्यालय, कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, शासकीय रुग्णालय तसेच रजीस्टार कार्यालय आदी महत्त्वाची कार्यालये आहे. या चौकात मोठी वर्दळ असते. या संधीचा फायदा घेत पानटपरी चालकांनी तहसील कार्यालय व पाटबंधारे विभागाच्या संरक्षण भिंतीला लागून दुकानदारी थाटली होती. यामुळे वाहन धारकांना वाट काढणे कठीण झाले होते. याच चौकातून श्रीक्षेत्र घोराड, बोरधरण येथील अभयारण्यात जाण्यासाठी पर्यटकांचीही गर्दी असते; पण लघु व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याने बस, आॅटो डांबरी रस्त्यावर उभे राहत होते. यामुळे रहदारी धोक्याची ठरत होती. या अतिक्रमणाकडे काही संघटनांनी प्रशासनाचे लक्ष वेधले होते. ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर बांधकाम विभागाने सुमारे दोन महिन्यांपूर्वी संबंधितांना नोटीस बजावली होती; पण याकडे कुणीही लक्ष दिले नाही. तीन दिवसांपूर्वी पुन्हा स्मरणपत्र देण्यात आले. यानंतर बुधवारी अतिक्रमण काढण्यासाठी शेवटची संधी देण्यात आली. यावरून सकाळपासूनच काही व्यावसायिकांनी पानटपऱ्या हटविल्या. काही दुकाने जेसीबीच्या साह्याने उचलून नेण्याची कारवाई बांधकाम विभागाने केली. ही कारवाई सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता राजेश कुबडे, एस.वाय. भगत, कर्मचारी गावंडे, झामरे, कोडापे, ठाणेदार विलास काळे, पांडे, वानखेडे यांनी केली. दंगल नियंत्रण पथकाने त्यांना सहकार्य केले. शहरात प्रथमच पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटविण्यात आल्याने नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.(तालुका/शहर प्रतिनिधी)