शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘त्या’ आरोपींची कारागृहात रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 21:19 IST

स्थानिक पोलिसांच्या दारूबंदी पथकाने सुरू असलेल्या दारूभट्टीवर छापा घालून दोन जणांना रंगेहात पकडले. न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. परंतु दारूभट्टीकरिता वापरण्यात आलेले लाकूड हे आडजातसह सागवान असल्याने वनविभाग काय कारवाई करतो, करते याकडे जनसामान्यांचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देदारूभट्टीवर छापा प्रकरण : वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह कायम

लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : स्थानिक पोलिसांच्या दारूबंदी पथकाने सुरू असलेल्या दारूभट्टीवर छापा घालून दोन जणांना रंगेहात पकडले. न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. परंतु दारूभट्टीकरिता वापरण्यात आलेले लाकूड हे आडजातसह सागवान असल्याने वनविभाग काय कारवाई करतो, करते याकडे जनसामान्यांचे लक्ष लागले आहे.सविस्तर असे की, रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास सुरगाव मौजा येथे धामनदीलगत वनविभागाच्या भूखंडावर राजकीय पक्षाचा पदाधिकारी असलल्या विशाल मधुकर रंगारीसह राजेश पांडुरंग मेहता यांची मोहाफुलापासून गावठी दारूभट्टीचा व्यवसाय सुरू होता. या दारूभट्टीवर सेलू पोलिसांच्या दारूबंदी पथकाने छापा घालून आरोपींना ताब्यात घेतले.ही दारूभट्टी वनविभागाच्या अखत्यारित असल्याने व दारूभट्टीकरिता सागवान लाकडांचा बेकायदेशीरपणे वापर झाल्याने वनविभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह लागले आहे. वनविभाग दारूभट्टी व्यावसायिकांवर काय कारवाई करतो, याकडे जनसामान्यांचे लक्ष लागले आहे.वनविभाग मौन का?शासनस्तरावरून कोट्यवधी रुपये खर्च करून वृक्षलागवड करण्यात येत आहे. असे असताना दारूभट्टीकरिता साग जातीच्या लाकडांचा सर्रास वापर होत आहे. यावर वनविभागाचे अधिकारी तथा कर्मचारी मौन बाळगून का, याविषयी दारूबंदी महिला मंडळाकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे.