सेलू : येथील श्रीकृष्ण जिनिंग फॅक्टरीच्या कापूस संकलन केंद्रावर जिनिंग मालकाने स्वनिर्मित कायदा करून कित्येक वर्षांपासून एक रुपयाही शेतकऱ्याला न देता अनामत कापूस ठेवून घेण्याचा गोरखधंदा सुरू केला. शेतकऱ्यांना चुकाऱ्यासाठी हेलपाटे मारायला लावले. या नियमबाह्य व्यवसायाविरुद्ध ‘लोकमत’ने रविवारी वृत्त प्रकाशित करताच जिनिंग मालकावर कारवाई करण्यात आली. बाजार समिती प्रशासकांनी कापूस संकलन केंद्राला भेट देवून नियमबाह्य लावलेला फलक काढण्याचा आदेश दिला. एवढेच नव्हे, तर अनामत कापसात शेतकऱ्यांची फसवणूक करून शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या जिनिंग मालकावर कारवाईचा बडगा उगारला. आजपर्यंत लाखो क्विंटल कापूस अनामतमध्ये घेवून या जिनिंग मालकाने शेतकऱ्यांच्या भरवशावर फुकटात व्यवसाय करून शेतकऱ्यांना पैसे देताना फजिती केल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांच्या आहे.(तालुका प्रतिनिधी)
अखेर अनामत कापूस खरेदीचा फलक काढला
By admin | Updated: January 14, 2015 23:13 IST