शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

अखेर चौकशी समिती गठित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 21:33 IST

पशुसंवर्धनच्या शिपायाने खोटी बतावणूक करून १४ शेतकऱ्यांना २२ लाखांनी गंडा घातल्या प्रकरणी अखेर चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हवालदील शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेता २१ एप्रिलला वृत्त प्रकाशित करून सदर प्रकरणावरील पडदा लोकमतने उचलला होता.

ठळक मुद्दे१४ शेतकऱ्यांची २२ लाखांनी फसवणूक केल्याचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : पशुसंवर्धनच्या शिपायाने खोटी बतावणूक करून १४ शेतकऱ्यांना २२ लाखांनी गंडा घातल्या प्रकरणी अखेर चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हवालदील शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेता २१ एप्रिलला वृत्त प्रकाशित करून सदर प्रकरणावरील पडदा लोकमतने उचलला होता. याच वृत्ताची दखल घेत जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी ही चौकशी समिती गठीत केली असून समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर दोषीवर फौजदारी कारवाई केली जाणार आहे.७५ टक्के अनुदानावर गाय, म्हशी देण्याची योजना सन २०१८-१९ पासून आॅनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. मात्र, निलंबीत शिपाई गुरनुले याने आष्टी तालुक्यातील १४ शेतकऱ्यांना तब्बल २२ लाखाचा गंडा घातला. याची दखल घेत शिवसेना आर्वी विधानसभा प्रमुख बाळा जगताप यांनी शेतकऱ्यांना घेवून आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्याच दरम्यान लोकमतने वृत्त प्रकाशीत करताच पशुसंवर्धन विभागात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर तातडीने २२ एप्रिलला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकाºयांनी चौकशी समिती गठीत केली.यामध्ये जे.एल. वसावे उपमुख्य लेखा तथा वित्त अधिकारी यांची पथक प्रमुख म्हणून नियुक्ती केली. सोबतच पशुधन विकास अधिकारी डॉ. पी. व्ही. वंजारी, सहाय्यक प्रशासन अधिकारी हेमंत भोयर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी नंदू बोबडे यांचा समावेश आहे. समितीचा अहवाल प्राप्त होताच सदर शिपायाला बडतर्फ करीत त्याच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.गुरनुलेविरुद्ध यापूर्वीही ४२० चा गुन्हापशुसंवर्धनचा कर्मचारी नंदकिशोर गुरनुले हा पशुवैद्यकीय दवाखाना पार्डी ता. कारंजा येथे कार्यरत होता. त्याने आर्वी तालुक्यातील पिंपळखुटा येथील शेतकऱ्याची फसवणूक केली. त्यावेळी चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. त्याचा अहवाल १५ जून २०१८ ला प्राप्त झाल्यावर तात्काळ निलंबन करून सेलू येथे बदली झाली होती. त्याच्यावर ९ जुलै २०१८ ला तळेगाव पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ४२०, ४६८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.चौकशी समिती गठित करण्यात आली असून अहवाल प्राप्त होताच योग्य कारवाई होईल; पण शेतकºयांनी आता जाणून घेतले पाहिजे की कुठल्याही प्रकारच्या योजना आॅफलाईन नाहीत. शासनाने सर्व योजना आॅनलाईन सुरू केल्या आहे. शेतकºयांनी योजनांचा लाभ घेण्यासाठी नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये प्रत्यक्ष जावूनच अर्ज सादर करावा. त्यानंतर सदरचा अर्ज पं.स.स्तरावरील पशुधन विकास अधिकारी विस्तार यांचे शिफारशीने कार्यालयात प्राप्त होतो. योजनानिहाय लाभार्थी निवड समितीद्वारे करून त्याची यादी पुन्हा पं. स. स्तरावर पशुधन विकास अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येते. गुरनुले यांनी आणखी काहींची फसगत केली असेल तर त्यांनी लेखी तक्रार पशुसंवर्धन विभाग जि.प. वर्धा येथे सादर करावी.- डॉ. प्रज्ञा गुल्हाणे, पशुसंवर्धन अधिकार, जि.प. वर्धा.पशुसंवर्धनचा शिपाई नंदकिशोर गुरनुले याने केलेल्या ठगबाजी प्रकरणी योग्य कार्यवाही करण्यासाठी चौकशी समिती गठित केली आहे. याच चौकशी समितीचा अहवाल प्राप्त होताच बडतर्फीची कारवाई करण्यात येईल. शिवाय वेळप्रसंगी दोषी शिपायावर फौजदारी कारवाईही करण्यात येईल.- डॉ. सचिन ओंबासे, मुख्य कार्यपालन अधिकारी, जि.प. वर्धा.

टॅग्स :Farmerशेतकरीfraudधोकेबाजी