शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

अखेर चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळांमध्ये संचारला उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2021 05:00 IST

शैक्षणिक भवितव्याचा विचार करून शासनाने शाळा सुरू कराव्यात अशी विद्यार्थी, पालक यांच्यासह शिक्षकांचीही इच्छा होती. ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी आणि शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग पूर्वीच सुरू झाले. परंतु उर्वरित वर्गांना शासनाकडून परवानगी मिळाली नव्हती. अखेर ग्रामीण भागातील पहिली ते चौथी आणि शहरी भागातील पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग १ डिसेंबरपासून सुरू करण्याचे निर्देश शासनाने दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या महामारीमुळे तब्बल पावणे दोन वर्षांनंतर शासनाच्या निर्देशानुसार आजपासून ग्रामीण भागातील पहिली ते चौथी तर शहरी भागातील पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी  जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील पहिली ते चौथीपर्यंतच्या १ हजार १५९ शाळा सुरू झाल्याने बहुतांश विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली. त्यामुळे चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळा परिसरामध्ये उत्साह संचारला होता.शैक्षणिक भवितव्याचा विचार करून शासनाने शाळा सुरू कराव्यात अशी विद्यार्थी, पालक यांच्यासह शिक्षकांचीही इच्छा होती. ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी आणि शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग पूर्वीच सुरू झाले. परंतु उर्वरित वर्गांना शासनाकडून परवानगी मिळाली नव्हती. अखेर ग्रामीण भागातील पहिली ते चौथी आणि शहरी भागातील पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग १ डिसेंबरपासून सुरू करण्याचे निर्देश शासनाने दिले. त्यानुसार पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ९७१ तर शहरी भागातील १८८ पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्यात. यात ग्रामीण भागात २४ हजार ४१२ तर शहरी भागात १२ हजार ८०६ विद्यार्थी उपस्थित झाले होते. त्यामुळे तब्बल पावणे दोन वर्षांनंतर शाळेचा परिसर विद्यार्थ्यांनी गजबजून गेला होता. शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार शाळांनी व्यवस्था केली आहे. त्यासोबतच आज पहिल्या दिवशी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व चॉकलेट देऊन स्वागत केले.

तीन दिवसात अहवाल सादर कराशासनाच्या परिपत्रकातील मार्गदर्शन सूचनांनुसार शाळा सुरु करण्यासंदर्भातील पूर्व तयारीबाबत पडताळणी करुन खात्री करण्याचे निर्देष जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे. त्यानुसार प्राथमिकचे शिक्षणाधिकारी लिंबाजी सोनवणे यांनी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठविले असून सर्व विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख व समग्र शिक्षा अभियानातील सर्व कर्मचाऱ्यांनी गटातील सर्व शाळांची पडताळणी करण्याचे नियोजन करुन १०० टक्के शाळांच्या पडताळणीसोबतच सर्व शाळांचा अहवाल प्रपत्रानुसार संकलित करुन तीन दिवसात अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.

 

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या