शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पूर्ती साखर कारखाना वसाहतीत युवकावर प्राणघातक हल्ला

By admin | Updated: October 5, 2014 23:09 IST

घरी आराम करत असलेल्या युवकाला बाहेर बोलावून त्याच्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना जामनी येथील पुर्ती सहकारी साखर कारखानाच्या वसाहतीत रविवारी रात्रीच्या सुमारास घडली.

आकोली : घरी आराम करत असलेल्या युवकाला बाहेर बोलावून त्याच्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना जामनी येथील पुर्ती सहकारी साखर कारखानाच्या वसाहतीत रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. रॉबीन बोस असे जखमी युवकाचे नाव आहे. हा हल्ला नेमका कुणी केला हे अद्याप कळू शकले नाही. या प्रकरणी पोलिसात मात्र तक्रार दाखल करण्यात आली नाही.सविस्तर वृत्त असे की, मुळचा पश्चिम बंगाल येथील रॉबीन बोस हा पुर्ती साखर कारखान्यात फिटर या पदावर काम करीत आहे. तो त्याच्या परिवारासह कारखान्याच्या वसाहतीत वास्तव्यास आहे. शनिवारी रात्री ८ वाजता तो कामावरून घरी आला. रात्री ९.३० वाजताच्या सुमारास त्याच्या घरच्या दरवाजावर कुणीतरी थाप मारत रॉबीनभाऊ घरात आहे का अशी विचारणा केली. रॉबीनने दरवाजा उघडताच चेहऱ्याला रूमाल बांधून बांधलेल्या तीन इसमानी त्याच्यावर धारदार तलवारीने प्रहार केला. यात त्याच्या उजव्या हाताची रक्तवाहिनी तुटली. तसेच डोक्यावर व मानेवर तलवारीचे जबर घाव बसले. पत्नीने लगेच धाव घेत त्यांना सोडविले. त्यांची पत्नी येताच हल्लेखोरांनी तत्काळ पळ काढला. शेजाऱ्यांच्या मदतीने रॉबीनला वर्धेच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आपल्यावर पुन्हा हल्ला होईल या भीतीने रॉबीन याच्या कुटुंबीयांनी अद्याप पोलिसात तक्रार दाखल केली नसल्याचे सांगितले जाते. जखमीला पत्नी व तीन वर्षांचा मुलगा आहे. हा हल्ला कुठल्या कारणाने झाला हे अद्याप कळू शकले नाही. हा वाद जुन्या वैमनस्यातून झाला असल्याचा संशय परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला आहे.(वार्ताहर)