शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
3
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
4
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
5
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य तिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
6
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
7
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
8
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
9
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
10
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
12
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
13
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
14
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
15
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
16
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
17
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
18
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
19
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
20
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी

कला महोत्सव कलाकारांसाठी पर्वणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 00:18 IST

प्रत्येकाच्या अंगी कलागुण दडलेले असतात, त्याला केवळ चालना देण्याची प्रतीक्षा असते. हीच बाब हेरून कलागुणांचे धनी असलेल्या बालकांसह युवकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी वर्धा कला महोत्सवाची सुरुवात करण्यात आली.

ठळक मुद्देमहिला शेतकरी उद्योजिकेच्या हस्ते उद्घाटन : २ हजार ६९९ युवक-युवतींना मिळाले व्यासपीठ

आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : प्रत्येकाच्या अंगी कलागुण दडलेले असतात, त्याला केवळ चालना देण्याची प्रतीक्षा असते. हीच बाब हेरून कलागुणांचे धनी असलेल्या बालकांसह युवकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी वर्धा कला महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. शहरापुरत्या असलेल्या या महोत्सवाने उत्तरोत्तर व्यापक रूप धारण केले. कालांतराने जिल्हास्तर, विदर्भस्तर तर यावर्षी हा महोत्सव राज्यस्तरावर जाऊन पोहोचला. या महोत्सवात राज्यभरातून विविध स्पर्धेमध्ये तब्बल २ हजार ६९९ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. त्यामुळे वर्धा कला महोत्सव खऱ्या अर्थाने वर्ध्यातीलच नाही, तर राज्यातील कलाकारांसाठी व्यासपीठ निर्माण करून देणारा ठरला आहे.वर्ध्यातील लोक महाविद्यालयाच्या प्रांगणावर १० ते १५ जानेवारीपर्यंत वर्धा कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन यावर्षी सेलू तालुक्यातील महिला शेतकरी उद्योजिका सविता येळणे यांच्या हस्ते करण्यात आले.या सोहळ्याला स्वागताध्यक्ष आमदार डॉ. पंकज भोयर, खासदार रामदास तडस, नगर पालिकेचे उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर, अभ्युदय मेघे, संजय इंगळे तिगावकर, प्रशांत बुरले, वरुण पांडे, अशोक झाडे तर बक्षीस वितरण समारंभाला माजी खासदार दत्ता मेघे, आमदार डॉ. भोयर, संजय इंगळे तिगावकर, अनिल नरेडी, सुनील शिंदे, रामनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार अशोक चौधरी, मोहन अग्रवाल, प्रवीण पेठे यांची उपस्थिती होती. सकाळपासून तर सायंकाळपर्यंत चालणाºया या महोत्सवाचा वर्धेकरांनी लाभ घेतलाया संघटनांचे मिळाले सहकार्यवर्धा कला महोत्सवाला दत्ता मेघे फाऊंडेशन व वर्धा कला महोत्सव समितीसह विदर्भ साहित्य संघ, गुरुदेव सेवा मंडळ, बहार नेचर फाऊंडेशन, फु टपाथ स्कूल, फें्रड्स कल्चर ग्रुप,साक्षी डान्स क्लासेस, वेदिका डांन्स क्लासेस, आदर्श कोचिंग क्लासेस, प्रगती संगित विद्यालय, कलास्पर्श फाऊंडेशन, कलार्पण संस्था, स्कूल आॅफ स्कॉलर, विदर्भ माध्यमिक मुख्याध्यापक संघ, श्री नामदेव बहुद्देशिय संस्था, उर्ष:काळ सेवा सदन आणि इतरही काही संस्था व नवयुवक-युवतींच्या सहकार्याने हा कला महोत्सव यशस्वी होत आहे.कला महोत्सवाचा तप पूर्णदादाजी धुनिवाले यांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त दादाजी धुनिवाले देवस्थानाच्या सभागृहात महोत्सवाचे बीज रोवले गेले. या महोत्सवात दादाजी धुनिवाले देवस्थान आणि वर्धा कला महोत्सव समितीचा सहभाग असायचा. त्यानंतर दत्ता मेघे फाऊंडेशन आणि इतर संस्थांचा सहभाग मिळाला. या महोत्सवाचे स्वागताध्यक्ष म्हणून आमदार डॉ. पंकज भोयर यांची निवड झाल्यानंतर स्वरूप व्यापक झालं. याला माजी खासदार दत्ता मेघे यांचेही भरीव सहकार्य मिळत आहे. हा महोत्सव सभागृृहातून नंतर केसरीमल कन्या शाळेच्या मैदानावर घेण्यात आला. मागील चार ते पाच वर्षांपासून लोक महाविद्यालयाच्या मैदानावर घेण्यात येत आहे. पाहता-पाहता या महोत्सवाला यावर्षी बारा वर्षे पूर्ण झाली आहेत. या महोत्सवातून अनेक कलाकार घडले असून त्यांनी विविध स्पर्धेत आपले नावही उंचावले आहे.सहा दिवस भरगच्च कार्यक्रमाची मेजवानीकेवळ स्पर्धा घेऊन व्यासपीठ उपलब्ध करुन देणे याही पलीकडे जात आयोजकांनी नागरिकांचे मनोरंजन आणि जिभेचे चोचले भागविण्याचीही व्यवस्था या महोत्सवात केली. १० जानेवारीपासून सुरु झालेल्या या महोत्सवाची १५ जानेवारीला सांगता करण्यात आली. सहा दिवस चालेल्या या महोत्सवात विविध स्पर्धांसह शिव गर्जना ढोल ताशा पथकाचे सादरीकरण, योग प्राणायम शिबीर, सामुहिक ग्रामगीता वाचन, विद्यार्थी पक्षीमित्र संमेलन, बालकुमार साहित्य व कला संमेलन, लोककला सादरीकर, पथनाट्य सादरीकरण, शैक्षणिक मार्गदर्शन व चर्चासत्र, वाचन कट्टा, संगित वाद्य वादन कार्यक्रम घेण्यात आले. तसेच बालकांसाठी विविध खेळणी तर स्वादिष्ट पदार्थांची दुकाने आणि वस्तूंचीही दुकाने थाटण्यात आली होती.यशस्वी महोत्सव हा तीन महिन्यांच्या धडपडीचे फलितवर्ध्यातून सुुरू झालेला कला महोत्सव आता राज्यस्तरीय झाल्याने या महोत्सवाच्या आयोजनाकरिता तब्बल तीन महिने परिश्रम घेतले जातात. महोत्सवापूर्वी प्रत्येक जिल्ह्यात आॅडिशन घेतले जाते. यावर्षीच्या महोत्सवात यवतमाळ, अमरावती, अकोला, औरंगाबाद, नाशिक, भुसावळ, पुणे व मुंबई येथील २ हजार ६९९ स्पर्धक सहभागी झाले होते. प्रत्येक स्पर्धेतील विजेत्यांना रोख पुरस्कार, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. सोबतच सहभागी झालेल्यांनाही प्रमाणपत्र देण्यात आले. सर्वच स्पर्धेकरिता जवळपास दीड लाखाचे पुरस्कार देण्यात आले. आयोजनाकरिता समितीचे अध्यक्ष संदीप चिचाटे, सचिव अजय झाडे, सहसचिव पवन राऊत, नरेंद्र लोणकर, गौरव आेंकार, रसिक जुमडे, जीवन बागडे, प्रफुल्ल गायकवाड, दिलीप रोकडे, नितीन पोहणकर, आशीष पोहाणे, विजय बाभूळकर, प्राजक्ता मुते, मोहित सहारे, अजय ठाकरे, संजय इंगळे तिगावकर, अशोक झाडे, अभिलाष दाहुले, प्रशांत बुरले, वरुण पांडे, अजय देशपांडे यांच्यासह अनेक युवक-युवतींनी परिश्रम घेतले.