शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव रेल्वेतून दोघांनी घेतल्या उड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 23:29 IST

अकोला येथून वर्धेला येताना दोन प्रवाशी ज्ञानेश्वरी एक्सप्रेसमध्ये बसले. या रेल्वेला वर्धेत थांबा नसल्याने त्यांनी वर्धा स्थानक येताच गाडीची गती कमी होताच थेट रेल्वे फलाटावर उड्या मारल्या. यामुळे दोघेही गंभीर जखमी झाले.

ठळक मुद्देवर्धा रेल्वे स्थानकावरील घटना : दोघांवरही उपचार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अकोला येथून वर्धेला येताना दोन प्रवाशी ज्ञानेश्वरी एक्सप्रेसमध्ये बसले. या रेल्वेला वर्धेत थांबा नसल्याने त्यांनी वर्धा स्थानक येताच गाडीची गती कमी होताच थेट रेल्वे फलाटावर उड्या मारल्या. यामुळे दोघेही गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी सकाळी ८.३० वाजता घडली.पुनम कापदे (२१) रा. तापडीया नगर व विलास दत्तात्रय गिरी (४२) रा. कोल्हारी, गौरक्षण रोड जि. अकोला अशी जखमीची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील पुरूषाच्या खांद्याला तर युवतीच्या डोक्याला व हाताला जबर इजा झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस सुत्रानुसार, पुनम कापदे आणि विलास गिरी हे अकोला येथून ज्ञानेश्वरी एक्सप्रेसमध्ये चढले. त्यांना वर्धेला यायचे होते. प्रवासादरम्यान या गाडीचा वर्धेत थांबा नसल्याचे समोर आले. सदर गाडी बडनेरा स्थानकावरून रवाना होवून थेट नागपूरला थांबणार होती. यामुळे ते घाबरून गेले होते. त्यांनी वर्धा स्थानकावर गाडीची गती कमी झाल्याने थेट रेल्वे फलाटावर उडी मारली. यावेळी रेल्वे फलाटावर कार्यरत असलेल्या रेल्वे पोलीस शिपाई समाधान गवई, विपीन दातीर यांनी उडी घेताच दोघांनाही रेल्वेच्या दूर ओढले. यामुळे या दोघांचे प्राण वाचले. रेल्वेतून उडी घेताच दोघही बेशुद्ध झाले. त्यांना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर तातडीने उपचार झाल्याने प्राण बचावले. सध्या या दोघांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारी सुरू असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.यापूर्वीही घडले असे प्रकारवर्धा रेल्वे स्थानकावर गाडीची गती कमी होताच फलाटावर उड्या मारण्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. नागरिकांनी थांबा नसल्यास दुसºया स्थानकावर उतरल्यास जीवितास होणारा धोका टाळणे शक्य असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.