शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ब्राह्मणवाडा जंगल परिसरात आढळला वाघिणीचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 17:09 IST

क्षयरोगामुळे मृत्यू झाल्याचा प्रार्थमिक अंदाज

वर्धा : आर्वी वनपरिक्षेत्रात येणाऱ्या ब्राह्मणवाडा बीटाचा एक भाग असलेल्या तुल्हाणा भागातील पांझरा (गोंडी) जंगल परिसरात एका वाघिणीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून शवविच्छेदनाअंती मृत वाघिणीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली.

पांझरा गाेंडी (जंगल) परिसरात वाघिण मृतावस्थत पडून असल्याची माहिती मिळताच वनविभागाचे ठाकूर, आर्वी वनपरिक्षेत्र अधिकारी जाधव, बीट रक्षक डेहनकर, वन्यजीव प्रेमी कौशल मिश्रा, संजय इंगळे तिगावकर यांनी घटनास्थळ गाठून वाघिणीचा मृतदेह ताब्यात घेत घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अंधारे, डॉ. पाटील यांना पाचारण करण्यात आले. तीन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चमूने मृत वाघिणीचे शवविच्छेदन केले. मृत वाघिण ही ४ ते ५ वयोगटातील असून क्षयरोगामुळे तिचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वर्तविला जात आहे. असे असले तरी शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच वाघिणीचा मृत्यू नेमका कशाने झाला हे स्पष्ट होणार आहे.

मृत वाघिण बोर मधील की पाहूणी?सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पातील बहूतांश वाघ अन्न व पाण्याच्या शोधार्थ प्रादेशिकच्या जंगलाकडे जातात. विशेष म्हणजे प्रादेशिकच्या कार्यक्षेत्रात मुक्त संचार करणाऱ्या वाघांना कुठलाही नंबरींंग दिली जात नाही. ब्राह्मणवाडा नजीकच्या पांझरा (गोंडी) जंगल परिसरात मृतावस्थेत सापडलेली वाघिण ही बोर व्याघ्र प्रकल्पातील की पाहूणी याचा शोध सध्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेतला जात आहे.

टॅग्स :Tigerवाघ