शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

गावातील विकासाच्या मुद्यावर आर्वीतील महिला आक्रमक

By admin | Updated: September 11, 2016 00:42 IST

ग्रामपंचायतीच्या ढासळलेला कारभाराविरूद्ध ग्रामस्थांसह महिलांनी आक्रमक भूमिका घेतली.

गावात समस्यांचा डोंगर : सभेत अधिकाऱ्यांना धरले धारेवरगिरड : ग्रामपंचायतीच्या ढासळलेला कारभाराविरूद्ध ग्रामस्थांसह महिलांनी आक्रमक भूमिका घेतली. गावाच्या विकासाच्या मुद्यावर सभेत उपस्थित अधिकाऱ्यांना महिलांनी चांगलेच धारेवर धरले. यामुळे सभेत तणावही निर्माण झाला होता. अखेर समस्या नोंदवून अधिकाऱ्यांना काढता पाय घ्यावा लागला.फरीदपूर गट ग्रा.पं. मधील आर्वी गावात ‘आमचा गाव आमचा विकास’ उपक्रमाची कृती आराखडा बैठक घेण्यात आली. ही बैठक वादग्रस्त ठरली. महिलांनी अधिकारी व ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांना गावाच्या विकासावर चर्चा करण्याऐवजी प्रत्यक्ष समस्या दाखविल्या. दरम्यान, काही युवकांचा शाब्दिक तोल गेल्याने वातावरण तापले होते. परिणामी, अधिकाऱ्यांनी नमते घेत नागरिकांनी सुचविलेली कामे विकास आराखड्यात नमूद करीत काढता पाय घेतला. आर्वी गावात आदिवासी बांधावांची वस्ती असली तरी विकासाबाबत गावाकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. गावात प्राथमिक सुविधांचा अभाव असल्याने येथील आदिवासी बांधवांना समस्यांना तोंड द्यावे लागते. ग्रा.पं. कडे तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याचा रोष महिलांनी सभेत व्यक्त केला. गावात पाणी पुरवठा योजना असून ग्रामस्थांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन सदोष असल्याने नळाला दूषित पाणी येते. यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. गावातील एक रस्ता वगळता पूर्ण रस्ते मजबुतीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. एका वॉर्डातील नालीचे बांधकाम झाले; पण उर्वरित संपूर्ण गावातील सांडपाणी रस्त्यावरून वाहते. यामुळे रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचले आहे. यामुळे गावात साथीचे आजार पसरण्याची भीती आहे. पिण्याच्या पाण्याची विहीर असून त्यात नालीतील गढूळ पाणी पाझरते. यामुळे विहिरीतील पाणी दूषित होत आहे. याकडे ग्रा.पं. दुर्लक्ष करीत असल्याने असंतोष पसरला आहे. मुख्य रस्त्यांनी विद्युत खांब आहे; पण पथदिवे लावले नाही. यामुळे रस्त्याने ये-जा करणे जिकरीचे आहे. फरीदपूर व आर्वी गावाच्या विकासासाठी कृती आराखडा सरपंच संजय राऊत यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी प्रशिक्षक अल्का वानखेडे, आरोग्य विस्तार अधिकारी वानखेडे, कृषी सहायक शेख, आरोग्य सेवक पी.टी. अंबादे, ग्रामसेवक तेलरांधे, ग्रा.पं. सदस्य अनिल गुडधे उपस्थित होते. आमचा गाव आमचा विकास कृती आराखड्यात नळयोजनेच्या विहिरीचे खोलीकरण, गावातील रस्त्यांची निर्मिती, नाल्याचे बांधकाम आदी कामांना मान्यता देण्यात आली. सभेला उपस्थितांचे आभार ग्रामसेवक तेलरांधे यांनी मानले.(वार्ताहर)