प्रज्ञावंतांचा सत्कार.. लोकमत समूहाच्यावतीने लोक प्रज्ञा परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेतील विजेत्या स्पर्धकांना शुक्रवारी आयोजित एका कार्यक्रमात पालकांसह पुरस्कृत करण्यात आले. या स्पर्धेत पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात वैभवी किशोर वाडेकर, मानव सुधीर मुंजेवार, वेदान्त राजेश तळवेकर, युक्ती रामभाऊ बोरकर, जान्हवी सुधीर मुंजेवार, साक्षी ताराचंद कांबळे, सृष्टी अनिल मुळे, वेदान्त देवगीरकर, सानिया संतोष नाखले, निमिश प्रशांत नितनवरे, अनविला राजेश तळवेकर, वैष्णवी सतीश सहारे, वैष्णवी प्रकाश कठाणे, सायली संजय देवगीरकर, प्रणव रामभाऊ बोरकर, श्रुती अनिल मुळे आणि साक्षी मनोहर मसने यांना सन्मानित करण्यात आले. नामांकित शाळांतील मुख्याध्यापकांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.
प्रज्ञावंतांचा सत्कार..
By admin | Updated: October 24, 2015 02:12 IST