शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मधमाशांच्या पोळाने पं.स. कार्यालयात भीतीचे वातावरण

By admin | Updated: February 3, 2017 01:51 IST

येथील पंचायत समिती परिसरातील कडुलिंबाच्या झाडावर असलेले आग्या मधमाशाचे पोळ नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहे.

बंदोबस्त करा : ६० ते ७० नागरिक जखमी समुद्रपूर : येथील पंचायत समिती परिसरातील कडुलिंबाच्या झाडावर असलेले आग्या मधमाशाचे पोळ नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहे. या मधमाशीच्या पोळ्यातील माशांच्या हल्ल्यात आतापर्यंत ६० ते ७० नागरिक जखमी झाले आहेत. यामुळे या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांत दहशत पसरली आहे. जाम-गिरड राज्यमार्गावरील पंचायत समिती कार्यालयासमोर एक मोठे लिंबाचे झाड आहे. या झाडावर पाच ते सहा महिन्यांपासून मधमाशीचे पोळे आहे. कडुलिंबाच्या झाडालगतच उपहारगृह असल्यामुळे तेथील भट्टीतून निघणाऱ्या ज्वालामुळे मधमाशा उडतात. त्या माशा रस्त्यावरील वाहनचालक, वाटसरूंवर हल्ला चढवितात. या हल्ल्यात आतापर्यंत ६० ते ७० नागरिक जखमी झाले. यामध्ये चिमुकल्यांसह ज्येष्ठही जखमी झाले. निसर्गाच्या नियमानुसार आता पानगळती सुरू झाल्यामुळे मधमाशाचे पोळ उघडे पडले आहे. त्यामुळे त्यांच्या हल्ल्यात वाढ झाली आहे. दररोज अचानक होणाऱ्या हल्ल्यामुळे नागरिक दहशतीत आहेत. एखादा हल्ला कुणाच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे या पोळाचा बंदाबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे. वनविभागाने मधमाशीचा बंदोबस्त करण्याची मागणी सूरज पेंदाम, रोशन वावधने अनिल कडवे, शुभम वाढई, प्रीतम लोहकरे, मंगेश चिताडे, निखिल पेंदामकर, वैभव मेन्ढुले, विजेंद्र वासे, सूबोध रंगारी, पंकज रोकडे आदींनी केले.(तालुका प्रतिनिधी)