शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीतील शेतकऱ्यांची कर्जाकरिता फरफट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 23:01 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामात पीक कर्जाकरिता भटकंती करावी लागत आहेत. यामुळे अनेकवेळा जिल्हाधिकाऱ्यांनी कर्जमाफीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्ज देण्याच्या सूचना दिल्या; मात्र बँकेला व्याजाची रक्कम हवी असल्याने त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांना बगल दिल्याचे दिसून आले आहे.

ठळक मुद्दे७७२ कोटी खरीप पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामात पीक कर्जाकरिता भटकंती करावी लागत आहेत. यामुळे अनेकवेळा जिल्हाधिकाऱ्यांनी कर्जमाफीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्ज देण्याच्या सूचना दिल्या; मात्र बँकेला व्याजाची रक्कम हवी असल्याने त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांना बगल दिल्याचे दिसून आले आहे. बँकांना नव्या कर्जाकरिता सातबारा कोरा हवा असल्याने ही रक्कम जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावी अशी भाषा बँकेच्यावतीने बोलण्यात येत आहे.यामुळे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या कार्यालयात मंगळवारी बैठक आयोजित होती. या बैठकीत बँकांना सर्व शेतकºयांना तात्काळ पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना बँकेच्या जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत दिल्यात.२०१८-१९ मध्ये खरीप पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ७७२ कोटी रुपये आहे. यापैकी बँकांनी आतापर्यंत ५.३० टक्के कर्ज वाटप झाले आहे. पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी बँकांनी कर्ज मेळावे आयोजित करून कर्ज घेण्यासाठी पात्र असलेल्या शेतकºयांना तात्काळ कर्ज वाटप करावे, असे सांगितले. तसेच कर्जमाफी योजनेमध्ये एकरकमी योजनेत १ लाख ५० हजार पेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांनी उर्वरित रक्कम बँकेत जमा करण्यासाठी बँकेनी पाठपुरावा करावा. ज्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळून त्यांना नव्याने कर्ज उपलब्ध करून देता येईल, असे सांगण्यात आले आहे.वर्ग दोनच्या जमीन धारकांसाठी केवळ पीक कर्जासाठी जिल्हाधिकारी यांनी सरसकट परवानगी दिली आहे. त्यामुळे वर्ग दोनच्या कोणत्याही शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे परवानगीसाठी पाठवून नये, असेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले. कोणत्याही बँकेने शेतकऱ्यांच्या खात्यात शासकीय योजनेचे जमा होणारे अनुदान कर्ज खात्यात वळते करू नये अशा सूचनाही त्यांनी दिल्या.या बैठकीला प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी करूणा जुईकर, जिल्हा उपनिबंधक अजय कडू, जिल्हा अग्रणी बँकेचे चौधरी, आरसेटीचे संचालक अनिल पाटील, उमेदचे जिल्हा व्यवस्थापक देवकुमार कांबळे उपस्थित होते.