शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षण भिंत नसल्याने घरे कोसळण्याची भीती

By admin | Updated: July 27, 2016 00:11 IST

गढीवर असलेल्या घरांना संरक्षण भिंत नसल्याने ती कोसळ्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देत संरक्षण भिंत बांधावी,..

पवनारच्या गढीवरील घरे धोक्यात : नागरिकांनी आमदारांचे लक्ष वेधले पवनार : गढीवर असलेल्या घरांना संरक्षण भिंत नसल्याने ती कोसळ्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देत संरक्षण भिंत बांधावी, अशी मागणी नागरिकांनी केली. याबाबत आ.डॉ. पंकज भोयर यांना निवेदन देण्यात आले. पवनार येथे इंदिरानगर येथू घरकूल योजनेचे व वैयक्तिक बांधलेली १०-१५ घरे आहेत. सदर घरे गढीवर असून त्या खाली पुरुषोत्तम हिवरे यांचे घर व रिकामा भूखंड आहे. हिवरे यांनी आपला भूखंड मोकळा करण्यासाठी जेसीबीच्या साह्याने खोदकाम करून आपला भूखंड मोकळा केला; पण त्यामुळे गढी कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे गढी सभोवताल संरक्षण भिंत बांधून द्यावी, अशी माणगी नागरिकांनी केली आहे. पावसामुळे गढीला ठिकठिकाणी तडे गेले असून त्यात पाणी मुरल्यास गढी कधीही कोसळून घरांचे नुकसान व जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या घरांना संरक्षण भिंतीचे बांधकाम करून द्यावी, अशी मागणी सरपंच अजय गांडोळे व सदर कुटुंबीयांनी केली. यावर आ.डॉ. भोयर यांनी ही अडचण लवकरच दूर केली जाईल, अशी ग्वाही दिली. निवेदन देताना नामदेव वाढवे, सुरेश काशीकर, रमेश कांबळे, कुंदण कळणे, मारोती कांबळे, लक्ष्मण खंगार, रंजीत धोंगडे, नरेश कोराम, राहुल, गणेश मसराम आदी उपस्थित होते.(वार्ताहर) निधी देण्याची मागणी पवनार येथे गढीवर असलेल्या घरांना पावसाळ्यात धोका असतो. पावसामुळे गढी ढासळून अपघाताची शक्यता बळावली आहे. यामुळे संरक्षण भिंतीच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून आ.डॉ. भोयर यांना करण्यात आली आहे. संरक्षण भिंतीचे बांधकाम झाल्यास घरांना सुरक्षा मिळेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.