शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

८१८ उमेदवारांचे भवितव्य इव्हीएममध्ये बंद

By admin | Updated: February 17, 2017 02:05 IST

जिल्हा परिषदेच्या ५० आणि पंचायत समितीच्या १०० अशा एकूण १५० जागांकरिता गुरुवारी मतदान झाले.

जिल्हा परिषद व पंचायत समितीकरिता मतदान : सकाळपासूनच केंद्रावर मतदारांची गर्दी; प्रक्रिया शांततेतवर्धा : जिल्हा परिषदेच्या ५० आणि पंचायत समितीच्या १०० अशा एकूण १५० जागांकरिता गुरुवारी मतदान झाले. या जागांकरिता ८१८ उमेदवार रिंगणात होते. या सर्वच उमेदवारांचे भवितव्य इव्हीएममध्ये बंद झाले आहे. काही मतदार केंद्रावर रांगा असल्यामुळे अंतिम आकडेवारी उशिरापर्यंत प्राप्त झाली नव्हती. जिल्ह्यात ६३ टक्के मतदान झाल्याचा अंदाज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून वर्तविला. मतदार याद्यांच्या घोळामुळे हजारोनागरिक मतदानापासून वंचित राहिले.अंतिम आकडेवारीनुसार आष्टी (शहीद) तालुक्यात ६५, आर्वी ६७, समुद्रपूर ७४.५७ व देवळी ६९ टक्के मतदान झाले. अंतिम आकडेवारी न आल्याने हिंगणघाट ७०, वर्धा ५३, कारंजा (घा.) ६५ व सेलू ६८ टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. दुपारी ३.३० वाजेपर्यंत जिल्ह्यात ७ लाख ३१ हजार ९९२ मतदरांपैकी ३ लाख ४३ हजार ५९२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात १ लाख ७८ हजार ८३६ पुरूष तर १ लाख ६४ हजार ७५६ स्त्री मतदारांचा समावेश आहे. असे असले तरी हिंगणी, घोराड, आंजी (मोठी), येळाकेळी, झडशी, तळेगाव (टालाटुले), सावंगी, केळझर, वायगावसह अनेक मतदान केंद्रवर सायंकाळी ५.३० वाजतानंतरही मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा कायम होत्या. जिल्ह्यात ९६१ केंद्रांवर सकाळी ७.३० वाजतापासून मतदानाला प्रारंभ झाला. कोरा येथील एक केंद्र वगळता जिल्ह्यात कुठेही इव्हीएममध्ये बिघाड झाल्याचे वृत्त नाही. येथे अर्धा तास उशिराने मतदान सुरू झाले. जिल्ह्यात सर्वत्र मतदानाचा उत्साह दिसून आला. सावंगी, वायगाव येथे भर दुपारीही मतदारांची गर्दी असल्याचे दिसून आले. मतदानाकरिता महिलांचा प्रतिसाद असलयाचे दिसून आले. असे असले तरी मतदार याद्यांच्या घोळामुळे अनेकांना मतदानापासून वंचित राहण्याची वेळ आल्याचे दिसून आले. अनेकांना केंद्रावर असलेल्या याद्यांत त्यांची नावे दिसली नसल्याने त्यांनी परतीचा मार्ग धरला. यामुळे वर्धा शहरातलगत असलेल्या भागात त्याचा मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.