शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
4
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
5
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
6
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
7
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
8
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
9
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
10
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
11
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
12
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
13
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!
14
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
15
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
16
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
17
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
18
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
19
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
20
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार

सफाई कामगार दाम्पत्याचे नगर पंचायतसमोर उपोषण

By admin | Updated: April 13, 2016 02:24 IST

१९ वर्षांपासून येथील मनोज सारसर व त्यांची पत्नी आशा सारसर हे दोघे सफाई कामगार म्हणून कार्यरत होते.

१९ वर्षे लोटूनही : नोकरीत कायम केले नसल्याचा आरोपआष्टी (श) : १९ वर्षांपासून येथील मनोज सारसर व त्यांची पत्नी आशा सारसर हे दोघे सफाई कामगार म्हणून कार्यरत होते. प्रदीर्घ काळ सेवा देऊनही तत्कालीन ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी व आताच्या नगर पंचायत प्रशासनाने त्यांना कायम न केल्यामुळे या दाम्पत्याने सोमवारपासून नगर पंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. येथे ग्रामपंचायत असताना २८ फेब्रुवारी २०१५ व ३० मार्च २०१५ रोजी तीन कर्मचाऱ्यांना कामावर घेवून तत्कालीन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी या तीनही कर्मचाऱ्यांना कायम केले. त्यामुळे १९ वर्षांची सेवा देऊनही आपणास कायम करण्यापासून डावलले असून हा आपणावर झालेला अन्याय आहे असे सफाई कामगार मनोज सारसर यांचे म्हणणे आहे. ग्रामपंचायत असताना या दोघांनी १९ वर्षे शहरातील रस्ते झाडण्याचे काम केले. आता नगरपंचायतने शहरातील सफाईचे काम ठेकेदाराकडे दिले. ठेकेदारांनी या सफाई कामगार जोडप्यास काही दिवस कामावर ठेवून नंतर कामावरून कमी केले. त्यामुळे त्यांच्यावर आज उपासमारीची वेळ आली आहे. न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार उपोषणकर्त्यां दाम्पत्याने व्यक्त केला आहे.अन्याय निवारण समिती आष्टीचे अध्यक्ष प्रा. बी. टी. उरकुडे यांनी ४ एप्रिल रोजी नगर पंचायतीच्या अध्यक्षांना यासंदर्भात लेखी निवेदन देऊन त्यांचे या प्रकरणाकडे लक्ष वेधले. नगर पंचायत प्रशासनाने पूर्ववत त्यांना कामावर घेवून त्यांना सेवेत कायम करावे. शासन नियमानुसार त्यांना वेतन सुरू करावे अन्यथा आष्टी अन्याय निवारण समितीतर्फे जनआंदोलन करण्याचा इशाराही नगर पंचायत प्रशासनास प्रा. उरकुडे यांनी दिला आहे. सध्या नगर पंचायती समोर अन्यायग्रस्त सारसर दाम्पत्य उपोषणाला बसले आहेत. उपोषणाची दखल घेऊन दाम्पत्यास न्याय मिळवून देण्याची मागणी समितीद्वारे केली जात आहे.(प्रतिनिधी) १८ एप्रिल रोजी होऊ घातलेल्या नगर पंचायतच्या सभेत या सफाई कामगार पती पत्नीस कायम करण्यासंबंधी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. ठेकेदाराने या जोडप्यास कामावरून कमी केले होते. पण त्यांना पूर्ववत कामावर घेण्याच्या सूचना ठेकेदारास दिल्या आहेत. त्यामुळे ते आज कामावरून कमी झालेले नाही. दोन्ही सफाई कामगारांची १९ वर्षांची सेवा लक्षात घेता त्यांच्यावर अन्याय होणार नाही, यासाठी नगरपंचायत प्रशासन कटीबद्ध आहे. - मीरा येणूरकर, अध्यक्ष नगर पंचायत, आष्टी.