शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जुलैमध्ये जिल्ह्यात दिवसाआड शेतकरी आत्महत्या

By admin | Updated: July 25, 2015 02:12 IST

निसर्गाची अवकृपा, शासनाचा नसलेला आधार यामुळे हतबल झालेला शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. वर्धा जिल्ह्यात दिवसाआड शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे विदारक वास्तव आहे.

२० दिवसांत १० आत्महत्यांची नोंद : सहा महिन्यांत ७३ शेतकऱ्यांनी संपविले जीवन वर्धा: निसर्गाची अवकृपा, शासनाचा नसलेला आधार यामुळे हतबल झालेला शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. वर्धा जिल्ह्यात दिवसाआड शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे विदारक वास्तव आहे. चालू जुलै महिन्यात अवघ्या २० दिवसांत १० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्रच सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. जिल्ह्यात कधी कोरडा तर कधी ओल्या दुष्काळाचा सामना शेतकरी करीत आहे. शेतकऱ्यांना शासनाकडून मदत जाहीर होते. त्याची रक्कम जिल्हा प्रशासनाकडे येते; मात्र प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराचा फटकाही या आत्महत्येत भरच घालत आहे. हक्काची रक्कम मिळविण्याकरिता वडध व वाघोडा सारख्या गावातील शेतकऱ्यांना प्रशासनाकडे आत्महत्येची परवानगी मागावी लागते. एका दाण्याचे शंभर दाणे करणाऱ्या या शेतकऱ्यावर ही वेळ येते हे जिल्ह्यातील विदारक चित्र आहे. शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू असतानाच जिल्ह्यात पिकांची झालेली अवस्था पाहता गत सहा महिन्यात ७३ आत्महत्या झाल्याचे समोर आले आहे. यात सर्वाधिक आत्महत्या फेब्रुवारी महिन्यात झाल्या आहेत. या महिन्यात १३ शेतकऱ्यांनी जीवन संपविल्याचे समोर आले आहे. जानेवारी २०१४ ते जुलै २०१५ या कालावधीत जिल्ह्यातील २०५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. नव्या खरीप हंगामात पहिला पाऊस ुपडल्यानंतर तब्बल महिनाभर पावसाने दगा दिला. यामुळे अंकुरलेली बिजांची वाढच खुंटली. यामुळे यंदाचा हंगाम हातातून जाताना शेतकऱ्यांना बघवत नसल्यामुळे जुलै महिन्याच्या केवळ २० दिवसांत तब्बल १० शेतकऱ्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. याबाबत शासनाला ना खंत ना उसंत असल्याचे दिसून येते. स्थानिक लोकप्रतिनिधी साधे सांत्वना करण्यासाठी आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेताना दिसून आले नाही. वर्धा जिल्हा विदर्भातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोडतो. सरकार बदललेले मात्र हा शिक्का पुसला गेला नाही ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. (प्रतिनिधी)मदतीकरिताही आत्महत्येची परवानगी मागण्याची वेळ विदर्भात शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून वर्धेची नोंद आहे. यामुळे शेतकऱ्यांकरिता असलेल्या विविध योजना राबविताना जिल्ह्याचा विचार प्रथम होणे अपेक्षित आहे. तसे होतही आहे; मात्र शासनाच्या अधिकाऱ्यांकडून ती राबविताना हयगय होत असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांना या मदतीपासून वंचित राहण्याची वेळ येत आहे. ही मदत मिळण्याकरिताही शेतकऱ्यांना आत्महत्येची परवानगी मागण्याची वेळी या जिल्ह्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १,२१८ आत्महत्या जिल्ह्यात सन २००१ पासून आतापर्यंत १ हजार २१८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी ५५७ शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळाली आहे. ६५२ शेतकऱ्याच्या आत्महत्या मदतीकरिता अपात्र ठरविण्यात आल्या आहेत.