शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कॅनलच्या अर्धवट कामाने शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 22:04 IST

जलयुक्त शिवार करण्याकरिता शासन कटीबध्द असल्याने याकरिता वेगवेगळ्या उपाययोजना राबवित असल्याचे दिसून येते. याच योजनेअंतर्गत निम्न वर्धा प्रकल्पातंर्गत शेत शिवारात कालव्याद्वारे पाणी पुरवठा केला जात आहेत. पण सदर कालव्याचे नियोजनबद्द काम होत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त आहे.

ठळक मुद्दे३० मीटर जागा सोडून केले नालीचे बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : जलयुक्त शिवार करण्याकरिता शासन कटीबध्द असल्याने याकरिता वेगवेगळ्या उपाययोजना राबवित असल्याचे दिसून येते. याच योजनेअंतर्गत निम्न वर्धा प्रकल्पातंर्गत शेत शिवारात कालव्याद्वारे पाणी पुरवठा केला जात आहेत. पण सदर कालव्याचे नियोजनबद्द काम होत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त आहे.येथील शेतकरी प्रमोद गजानन पाटील यांचे सोनेगाव (आ.) पांदन रस्त्याच्या बाजुला चिकणी शिवारात ४ एकर ओलीताखालील शेत आहेत. याच शेतातील ०.७८ हे.आर. शेत निम्न वर्धा प्रकल्पाच्या कालव्यात गेले. याची ८० टक्के रक्कम मिळाली पण उर्वरीत रक्कम व अधिग्रहीत विहिर व आम्रवृक्ष यांची मात्र आतापर्यंत रक्कम मिळाली नाहीत.याच शेतातून ०.७८ हे.आर मधून मोठा कालवा गेला आहेत. याच कालव्याचे पाणी शेताला लागुन असलेल्या नाल्यात सोडण्याकरिता पाटील यांच्या शेतातून नाली काढण्यात आली. परंतु कालव्याच्या तोंडाजवळ सिमेंटीकरण केलेत व नंतर ३० मिटर जागा सोडून पुन्हा सिमेंटीकरण करण्यात आले. परंतु मध्य भागातच ३० मीटरच्या नालीचे बांधकाम न केल्यामुळे येणारे पाणी सरळ शेतात घुसून शेत पडीत पडण्याची दाट शक्यता आहे. संबंधीत विभागाने लक्ष देऊन अर्धवट सोडलेल्या नालीचे पुर्णत: सिमेंटीकरण करावेत अशी मागणी प्रमोद पाटील यांनी केली. अशीच परिस्थिती या भागात अनेक ठिकाणी असल्याचे दिसून येत आहे.मी या शेतात ६ ट्रॉली शेणखत टाकले. परंतु ३० मीटर नालीचे सिमेंटीकरण न केल्यामुळे येणाऱ्या पाण्यामुळे पुर्णच शेणखत वाहून जाईल. यात माझे मोठे नुकसान होणार आहे.- प्रमोद पाटील, श्ोतकरी चिकणी.