शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

विकासकामांनी शेतकऱ्यांची वाढविली डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 23:20 IST

जिल्ह्यातील कित्येक शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचे पाणी साचून पिके खराब झालीत. तर कुठे बांध फुटून सुपीक मातीसह पिके खरडून गेलीत. यामुळे शेतकऱ्यांना फायदा कमी व नुकसानच अधिक झाले.

ठळक मुद्देकालव्याच्या खोदकामाने वाहतुकीस अडथळा : वाहनचालकांना मनस्ताप

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : शासनाकडून केल्या जात असलेल्या विकासकामांमुळे सुविधेऐवजी गैरसोयच अधिक होत असल्याचे चित्र चिकणी परिसरात दिसून येत आहे. यामध्ये मुख्यत: महामार्ग जलयुक्त शिवार अंतर्गत निम्न वर्धा प्रकल्प यशोदा नदी खोरे पुनर्जीवनअंतर्गत नदी, नाले, खोलीकरण, रूंदीकरण, सरळीकरण आदी विकासकामे शेतकऱ्यांसाठी डोकेदुखीच ठरत असल्याचे वास्तव आहे.विकास कामांमुळे डेरेदार वृक्ष धाराशाही पडलेत. तसेच जिल्ह्यातील कित्येक शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचे पाणी साचून पिके खराब झालीत. तर कुठे बांध फुटून सुपीक मातीसह पिके खरडून गेलीत. यामुळे शेतकऱ्यांना फायदा कमी व नुकसानच अधिक झाले.अधिकाऱ्यांनी कामामध्ये अनियमितता दाखविल्यामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहनचालकांना खोदकामामुळे त्रास सहन करावा लागत आहे. चिकणी, पढेगाव, वर्धा हा १६ कि.मी. अंतराचा डांबरी रस्ता असून या रस्त्यावर तीन ठिकाणी कालव्याच्या कामाकरिता खोदकाम करण्यात आले. भोयर यांच्या शेताजवळच्या वळणावर व रमेश नेहारे यांच्या शेताजवळ कालव्याच्या पाटसऱ्या टाकण्यात आल्यात. तिन्ही ठिकाणी डांबरीकरण अथवा सिमेंटीकरण गरजेचे होते. परंतु, ठिकाणी माती टाकून बुजविण्यात आले. अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. वर्धा हे जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे वर्दळ असते. एसटी बससह स्कूलबस, दुचाकी मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. खोदकामामुळे पडलेल्या खड्ड्यांचे सिमेंटीकरण किंवा डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी शेतकरी तथा वाहनचालक करीत आहेत.कामांचा दर्जाही सुमारचिकणी जामणी, पढेगावसह अन्य भागात विकासकामे सुरू आहेत; मात्र कामांचा दर्जा सुमार असल्याची ग्रामस्थांची ओरड आहे. विकासकामे करताना निदान काही दिवस तग धरतील, अशी करावी, असे ग्रामस्थांतून बोलले जात आहे.