शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी ग्रेडरवर भडकले

By admin | Updated: April 22, 2017 02:01 IST

येथील बाजार समितीत नाफेडद्वारे तूर खरेदी करताना ग्रेडिंगमध्ये मोठ्या प्रमाणात तूर बाद करण्याचा प्रकार झाला.

नाफेडच्या तूर खरेदीतून वाद :मध्यस्थीने वाद निवळला हिंगणघाट : येथील बाजार समितीत नाफेडद्वारे तूर खरेदी करताना ग्रेडिंगमध्ये मोठ्या प्रमाणात तूर बाद करण्याचा प्रकार झाला. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी ग्रेडरला मारहाण केली. यानंतर खरेदी प्रक्रिया ठप्प झाली होती. बाजार समिती सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी शेतकऱ्यांच्यावतीने मध्यस्ती केल्यानंतर तूर खरेदीला पुन्हा प्रारंभ झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. हिंगणघाट बाजार समितीत नाफेडच्यावतीने तूर खरेदी केंद्र सुरू आहे. ही खरेदी आता मोजक्या दिवसांकरिता असल्याने येथे शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे. असे असताना ग्रेडरकडून खरेदी अत्यंत संथ गतीने सुरू होती. आज सुमारे ५ हजार पोती तूर विक्रीच्या प्रतीक्षेत या केंद्रावर होती; मात्र संथ खरेदी प्रक्रिया आणि ग्रेडिंगमध्ये तूर बाद करण्याचे प्रमाण अधिक असल्याने शेतकरी संतप्त झाले. चार दिवस प्रतीक्षा केल्यानंतर तूर बाद करण्यात येत असल्याने काही शेतकऱ्यांचा राग अनावर झाला. यावर त्यांनी ग्रेडर तुषार चांगले याला कारण विचारले असता त्यांच्याकडून थातुरमातुर उत्तर मिळाले. यामुळे शेतकरी व ग्रेडर यांच्यात वाद उद्भवला. हा वाद विकोपाला गेल्याने शेतकऱ्यांकडून ग्रेडरला धक्काबुक्की करून मारहाण करण्यात आली. ग्रेडर चांगले हा दहापैकी फक्त दोन शेतकऱ्यांची तूर खरेदी करीत होता तर उर्वरित शेतकऱ्यांची तूर नापास करीत होता, असा संतप्त शेतकऱ्यांचा आरोप आहे. शेतकऱ्यांचा रोष वाढत असल्याने बाजार समिती सभापती अ‍ॅड. कोठारी आणि पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी शेतकऱ्यांची समजूत काढली तसेच तुरीचे ग्रेडिंग योग्य प्रकारे करण्याची सूचना ग्रेडर चांगले यांना केली. नाफेडच्यावतीने नागपूर येथील दी विदर्भ को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन या संस्थेद्वारे येथे तूर खरेदीची प्रक्रिया सुरू असून त्यांनी आवक वाढूनही फक्त एका ग्रेडरची नेमणूक या केंद्रावर केलेली आहे. सुरू हंगामात या केंद्रावर केवळ ३७ हजार क्विंटल तुरीची खरेदी या संस्थेने केल्याची माहिती आहे. नाफेडची खरेदी प्रक्रिया अत्यंत संथगतीने असल्याने तसेच खरेदी केंद्रावर चार दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी अद्याप तूर विक्रीकरिता आणलेली नाही, त्यामुळे नाफेडने खरेदीची मुदतवाढ करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.(तालुका प्रतिनिधी)