शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी धडकले कचेरीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:41 IST

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्यावतीने नाशिक ते मंत्रालय, मुंबई असा १८० कि़मी.चा ‘लाँग मार्च’ काढला.

ठळक मुद्देवर्धेतही निदर्शने : मुंबईतील मोर्चाच्या समर्थनार्थ

आॅनलाईन लोकमतवर्धा : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्यावतीने नाशिक ते मंत्रालय, मुंबई असा १८० कि़मी.चा ‘लाँग मार्च’ काढला. यात पदयात्रेत सहभागी शेतकऱ्यांना सहकार्य म्हणून सोमवारी वर्धेत काही शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत त्यांच्या मागण्या सादर केल्या.शेतकºयांकडून स्वामिनाथन कमिशन प्रमाणे हमी दर द्या, बोंड अळीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ४० हजार रुपये नुकसान भरपाई द्या, संपूर्ण शेतकऱ्यांचे कर्ज माफी करा, कसणाऱ्या शेकऱ्यांच्या नावे वनजमिनी करा, वीज बिले माफ करा, आदी मागण्यांना करण्यात आल्या आहेत. मुंबई येथे गेलेल्या शेतकºयांच्या मार्चोत राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून ५० हजारावर शेतकरी सहभागी झाले आहेत. यात वर्धा जिल्ह्यातून निवडक शंभरावर शेतकरी सहभागी आहेत.राज्य व केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या निवडणूक जाहीरनाम्यातील आश्वासनांची पूर्तता केली नाहीच, शिवाय २०१७ मध्ये नाशिकमध्ये महामुक्काम शेतकरी आंदोलनाचे वेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेले लिखित आश्वासनही पाळले नाही. त्यामुळे नाईलाजाने नाशिक ते मंत्रालय, मुंबई असा शेतकरी ‘लाँग मार्च’ निघाला आहे.जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या मागण्यांचे निवेदनसर्व शेतमालाचे हमी दर स्वामीनाथन कमीशनप्रमाणे वाढवून द्या, ते दर बाजारपेठेत मिळतील अशी व्यवस्था करा. शेतमालाचा हमी दर उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा धरून निश्चित करा. सर्व शेतकऱ्यांची थकीत वीज बिले माफ करा, लोडशेडींग बंद करा, शेतीला तेलंगणा व इतर राज्याप्रमाणे मोफत वीज पुरवठा करा. बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ४० हजार रूपये नुकसा भरपाई द्या. अप्पर वर्धा-लोअर वर्धा या धरणात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांनी पर्यायी जमिनीचे पैसे भरले. त्यांना पर्यायी जमीन द्या. त्यांना मिळणारा निर्वाह भत्ता वाढवून प्रती महा ४०० रूपयांऐवजी ३००० रुपये करा. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना प्राथमिक ते उच्च शिक्षणाचा खर्च राज्य सरकारने उचलावा. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांना प्रत्येकी १० लाख रूपये द्या. दुधाचे हमी दर प्रती लिटर ५० रूपये करा. प्रत्येक जिल्ह्यात अद्ययावत भाजी मंडीचे निर्माण करा.यासह अनेक मागण्यांचा समावेश आहे.