शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचा रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 22:32 IST

वर्धा ते हिंगणघाट मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु असल्याने याकरिता सोनेगाव ते एकुर्ली या पांदण रस्त्यावरुन दिवस-रात्र मुरुमाची वाहतूक होत आहे. या वाहतुकीमुळे रस्त्यालगतच्या शेतातील पिकांचे नुकसान होत आहे.

ठळक मुद्देवाहतुकीमुळे पीके धोक्यात : नायब तहसीलदारांकडून मौका चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (टा.) : वर्धा ते हिंगणघाट मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु असल्याने याकरिता सोनेगाव ते एकुर्ली या पांदण रस्त्यावरुन दिवस-रात्र मुरुमाची वाहतूक होत आहे. या वाहतुकीमुळे रस्त्यालगतच्या शेतातील पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे या पिकांच्या नुकसान भरपाईकरिता तळेगाव ते धोत्रा रस्त्यावर गावकऱ्यांसह शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले. यावेळी वाहतूक करणारे टिप्पर दिवसभर रोखून धरण्यात आले. अखेर नायब तहसिलदार जाधव यांनी मौका चौकशी केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.सोनेगाव ते ऐकुर्ली हा शेतकऱ्यांसाठी पांदण रस्ता आहे. याच रस्त्यावर कंत्राटदार कंपनीने मुरुम व दगडाकरिता शेत विकत घेतले आहे. या शेतातून पादणरस्त्याने मुरुमाची रात्र-दिवस वाहतूक सुरु आहे. या वाहतूकीमुळे उडणारी धुळ शेतातील गहू, चना, कापूस व तुरीवर गोळा होत असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. म्हणून या पिकांची नुकसान भरपाई मिळण्याकरिता जिल्हा परिषदेचे माजी सभापती मिलिंद भेंडे, अखिल मानवाधिकार आॅर्गनाईझेशनचे जिल्हा अध्यक्ष रवि तडस, सरपंच अतुल तिमांडे, माजी जि.प.सदस्य प्रमोद वरके यांच्यासह नागरिक व शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले. तलाठी व नायब तहसीलदारांनी मौका चौकशीकरुन पंचनामा केल्यानंतर सायंकाळी सहा वाजता रस्ता मोकळा करण्यात आला.नायब तहसीलदारांनी मौका चौकशी पंचनामा केला. उत्खनाचे आदेश पाहिले. टी.पी. तपासल्या, मौका चौकशीत शेतकऱ्याची नोंद केली. हा पंचनामा शुक्रवारी तहसिलदारांकडे सादर करण्यात येणार आहे.- मधुकर गेडाम, तलाठी, तळेगाव (टा.)पांदण रस्त्याने होणाऱ्या वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयाचे नुकसान भरपाई देण्यात यावी. अन्यथा गावकऱ्यांच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.- अतुल तिमांडे, सरपंच, तळेगाव (टा.)

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संप