शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संपाची धग कायम

By admin | Updated: June 7, 2017 00:30 IST

कर्जमुक्ती आणि ५० टक्के नफ्यासह हमीभावासाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाची धग जिल्ह्यात कायम आहे.

सहावा दिवस : बंद पाळून रस्त्यावर दूध-भाजी फेकून संताप व्यक्त लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : कर्जमुक्ती आणि ५० टक्के नफ्यासह हमीभावासाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाची धग जिल्ह्यात कायम आहे. मंगळवारी आंजी (मोठी) येथे बसस्थानक चौकात रस्ता रोको आंदोलन केले. याप्रसंगी आंजी बंदचे आवाहन केले होते. शेतकऱ्यांसह संघटनांनी दूध रस्त्यावर ओतत भाजीपाला फेकला. याप्रसंगी खा. रामदास तडस यांना निवेदनही देण्यात आले. शिवाय भूमिपूत्र संघर्ष वाहिनीने सावली (सास्ताबाद) व तरोडा येथे रस्ता रोको केला तर विरूळ व बरबडी येथे शेतकरी संघटनेने तलाठी कार्यालयांना कुलूप ठोकले. मांडगाव येथे मुंडन करून निषेध नोंदविला. समुद्रपूर येथे विदर्भ राज्य आघाडीच्यावतीने संपात उडी घेत तहसीलदारला निवेदन सदर केले. तर वर्धेत एसएफआयने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. आंजी (मोठी) येथील बसस्थानक चौकात शेतकरी संघटना व इतर सहकारी पक्ष, संघटनांद्वारे आंजी बंदचे आवाहन केले. बसस्थानक चौकात शेतकरी संघटनेचे शंकर बावणकर व पं.स. सदस्य राजेंद्र डोळसकर यांच्या नेतृत्वात शेतकरी एकत्रित झाले. गावातील प्रमुख मार्गाने फिरत बाजारपेठ बंद करण्यात आली. बाजार चौकात खा. रामदास तडस यांना घेराव करून निवेदनही देण्यात आले. खा. तडस यांनी विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. यानंतर बसस्थानक चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेला कांदे, आलू, कोबी या भाज्यांचा हार घालण्यात आला. यावेळी सुरेश खेडकर, राजेंद्र डोळसकर, माधव चोरे, इंद्रजीत बत्रा, रूपराव मोरे, मनोहर राऊत, गजानन कडू, कमलेश उईके, गुलजार पठाण, सरपंच राकेश भूतडा, लक्ष्मण कोंडलकर, गफार शहा, उमेश पुरी, जगदीश बत्रा, नरेश धोंगडी, चंद्रशेखर मंगरूळकर, आंजी व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खरांगण्याचे ठाणेदार प्रशांत पांडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. आर्वी तालुक्यातील सोरटा, विरूळ येथील तलाठी कार्यालयांना कुलूप ठोकण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गजानन निकम, सोरटाचे उपसरपंच मंगेश मानकर, रामभाऊ कुंभारे, गजानन खालखोने, सतीश दानी, मंगेश गव्हार्ले, रामभाऊ तुपकरी, अमर आकुडकर, वासुदेव गेटमे, अंकुश मुंडेकर, प्रशांत शरदकार, प्रभाकर मोहेकर आदी उपस्थित होते. भूमिपुत्र संघर्ष वहिनीच्यावतीने तरोडा, सावली (सास्ताबाद) येथील शेतकऱ्यांच्या सहकार्याने तरोडा व सावलीच्या बस स्थानकावर रस्ता रोको आंदोलन केले. याप्रसंगी शेतकऱ्यांनी रस्त्यावर टायर पेटवून भाजप शासनाचा निषेध नोंदविला. भूमिपूत्र संघर्ष वाहिनीच्या नेतृत्वात सुमारे ७० शेतकऱ्यांनी आंदोलन केले. समुद्रपूर तालुक्यातील बरबडी येथील शेतकऱ्यांनीही तलाठी कार्यालयाला टाळे लावत शासनाचा निषेध नोंदविला. यावेळी शेतकरी जयंत तिजारे, प्रमोद वांदिले, गणपत भारती, मोहन केमये, चंदु पेरकुडे, सचिन वांदिले, बालु तायवाडे, प्रफुल्ल घोड़े, युवराज घोडे, महेन्द्र पेरकुडे, दिगांबर चदंनखेडे, गुलाब वांदिले, राजु चौधरी, कान्हा घोडे, अभय झाडे, राहुल वानखेडे, संदीप कुटे, सचिन पेरकुडे, शुभम तिजारे, संकेत अवचट याच्यासह शेतकरी उपस्थित होते. मांडगाव येथील बस स्थानक चौकात शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध व भाजीपाला फेकून तसेच मुंडन करून सरकार विरोधात रोष व्यक्त केला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिकात्मक शवयात्रा काढण्याचा मनसुबा पोलिसांच्या हस्तक्षेपाने बारगळला. प्रारंभी शेतकरी हेमंत पाहुणे यांनी मुंडन केले. या आंदोलनात गुणवंत पाहुणे, मनोज चंदनखेडे, विक्की पिसे, अंकित दांडेकर, स्वप्नील देशमुख, गजानन पाहुणे, रवींद्र कोळसे, भूषण पाहुणे, अतुल वांदिले, नितीन वाटकर, प्रमोद बोरकर यांनी आंदोलन केले. विदर्भ राज्य आघाडीच्यावतीने संपात उडी घेत समुद्रपूर तहसीलदारला निवेदन सदर केले. यावेळी आघाडीचे उपाध्यक्ष अनिल जवादे, अजय मुडे, शेतकरी संघटनेचे डॉ. हेमंत इसनकर, महेश माकडे, राजू सोेंगे, गोकुल पाटील, शेखर तेलतुंबडे, अजय पानेकर, दिनेश वाघ, शेखर तेलतुंबडे, केशव भोले, शेषराव तुळणकर, सुनील हिवसे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. बुधवारी आर्वी बंदचे आवाहन शेतकऱ्यांच्या मागण्यांकरिता सुरू असलेल्या संपाला पाठींबा म्हणून बुधवारी प्रहार सोशल फोरम व परिसरातील शेतकऱ्यांच्यावतीने आर्वी बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या बंदमध्ये परिसरातील व्यापाऱ्यांनी सहभागी होत आपली प्रतिष्ठाणे बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकरी संपाचा आज सहावा दिवपस असून संपाची धग कायम असल्याने शेतकऱ्यांचा हा संप अधिकच तीव्र होत असल्याचे दिसत आहे.