शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

नव्या अर्जाकरिता शेतकऱ्यांची तारांबळ

By admin | Updated: July 31, 2016 00:39 IST

नैसर्गिक आपत्तीच्या संकटातून शेतकऱ्यांच्या पिकांना नुकसान भरपाई मिळावी याकरिता शासनाच्यावतीने पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

फणिंद्र रघाटाटे वर्धा नैसर्गिक आपत्तीच्या संकटातून शेतकऱ्यांच्या पिकांना नुकसान भरपाई मिळावी याकरिता शासनाच्यावतीने पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधानांनी यात असलेल्या जाचक अटी रद्द करून नव्याने सुधारित पीक विमा योजना सुरू केली. नव्या योजनेनुसार भरावा लागणारा हप्ता अत्यल्प असल्याने योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी वाढत आहे; पण योजनेत सहभागी झालेल्यांना मिळणारे नुकसान एक खासगी कंपनी देणार असल्याने त्या कंपनीच्या अर्जाकरिता शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. अर्जाकरिता शेतकरी भटकत असताना योजनेची अंतिम तारीख आली आहे. अर्जाची मागणी वाढत असल्याने शासनाच्यावतीने दोन दिवसांची मुदतवाढ दिली आहे. पण ही मुदतवाढ शेतकऱ्यांच्या मागणीवरून नाही तर बँकांच्या संपामुळे देण्यात आल्याची माहिती आहे. पीक विमा योजनेची अंतिम तारीख आता २ आॅगस्ट करण्यात आली. असे असले तरी योजनेतील अटी व नियम दरदिवशी बदलत असल्याने शेतकऱ्यांची मोठी धावपळ होत आहे. आधी कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना कोणतीच वेगळी कार्यवाही करण्याची गरज नव्हती. कर्जाच्या हप्त्यातून बँक पीक विमा योजनेचा हप्ता कापून घेत होते. यावर्षी याशिवाय ज्यांना पीक विमा योजनेत सहभागी व्हायचे आहे, त्यांना पंचायत समितीकडून ठरविलेला अर्ज भरून तो बँकेत जमा करणे आवश्यक केले. त्यानुसार सदर अर्ज मिळवून तो भरून बँकेत जमा केला. अशात कृषी सहायकांनी जी कंपनी विम्याचा लाभ देणार आहे, त्या कंपनीने योजनेत सहभागी होण्यासाठी त्यांच्याद्वारे नियोजित केलेला अर्ज भरण्याबाबत शेतकऱ्यांना कळविले. नुकसान भरपाई देणारी कंपनी पिकांची पाहणी सॅटेलाईटद्वारे करून नुकसानीचा निर्णय घेणार आहे. शासनाने योजनेबाबत प्रसिद्धी केल्याने शेतकरी या योजनेत सहभागी होत आहे. अशात कोट्यवधी रुपये खाजगी कंपनीच्या तिजोरीत जमा झाल्यावर खरच नुकसान भरपाई मिळेल की शेतकऱ्यांना लुटण्याचाच हा प्रकार आहे, अशी चर्चा असली तरी योजनेत सहभागी होणाऱ्यांची बँकेत गर्दी होत आहे. शेतकऱ्यांवर कृषी सहायकाच्या मागे धावण्याची वेळ शासनाच्यावतीने करण्यात आलेल्या सूचनेनुसार आवश्यक असलेल्या अर्जाकरिता शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. सदर अर्ज कृषी सहाय्यकाजवळ उपलब्ध असून तो मिळविणे शेतकऱ्यांसाठी कटकटीचे झाले आहे. सध्या शेतीची कामे सुरू असून त्यात शेतकरी व्यस्त आहेत. अशा व्यस्त कालावधीत शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.