शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
2
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
3
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
4
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
5
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
6
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
7
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
8
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
9
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
10
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
11
मुसळधार पावसात AC सुरू ठेवणं योग्य आहे का? बहुतेक लोक करतात 'ही' चूक
12
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
13
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
14
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर
15
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
16
काय वाटले असेल...? एनआयटी टॉपरला ४५ लाखांचे पॅकेज मिळाले अन् अचानक नोकरीवरून काढले...
17
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षावर दोन ग्रहणांचे सावट; श्राद्धविधीत होणार अडचण? 
18
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
19
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
20
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत

अपेक्षित भावामुळे तीळ पेऱ्याकडे शेतकऱ्यांचा वाढला कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 17:19 IST

Wardha : तिळाचा काढणीचा हंगाम मे महिण्यात येत असतो. त्यानंतर खरीपाचे शेतकरी पीक घेतो.

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : शेती परवडत नाही अशी सारखी ओरड आता सर्व स्तरांवर होताना दिसून येत आहे. जिल्ह्यात तीळ पेरा नसल्या जमा होता. मात्र, आता काही शेतकरी उन्हाळी तिळाकडे वळल्याने आर्थिक लाभ पदरात पाडून घेण्यासाठी दिसून येत आहे. रब्बीतच त्याची तयारी व नियोजनही करण्यात आल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू असल्याचे दिसून येत आहे.

तिळाची फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या वा तिसऱ्या आठवड्यात पेरणी करावी लागते. यासाठी जमीन चांगली वखरून भुसभुशीत केल्यास पेरणी आणि उगवण क्षमता चांगली राहते. हेक्टरी चार किलो तीळ आवश्यक आहे. पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करणे आवश्यक आहे. तिफण, सरते वा ट्रॅक्टरच्या माध्यमातून पेरणी केली जाते. पण बरेचदा तीळ बारीक असल्याने तिफन वा सरत्यांनी पेरताना बारीक वाळू वा राख यांचा सुद्धा उपयोग करतात. खतांची मात्रा सुद्धा दिली जाते. काही शेतकरी शेणखताचा वापरही करतात. पेरणीपूर्वी नंतर बारा-पंधरा दिवसांनंतर पाणी देणे तसेच फुलांवर आल्यावर गरजेनुसार पाणी देणे वाढीसाठी आणि भरण्यासाठी पोषक ठरते. डवरणी निंदाई आंतरमशागत म्हणून केली जाते.

फवारणी केल्यास रोगांवर नियंत्रण मिळणे शक्यउन्हाळ्यात शेतकरी जास्त पीके घेत नसल्यामुळे तिळावर मावा, तुडतुडे, पाने खाणारी अळी आदी प्रकारचे रोग येत असतात. या रोगांचा परिणाम उत्पादनावर पडत असतो. मात्र, यावर वेळीच मार्गदर्शन घेऊन फवारणी केल्या रोगावर नियंत्रण मिळु शकते.

"मी तीन वर्षांपासून तीळ पीक घेत आहे. शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. मागच्या वेळी दोन एकरात सहा क्विंटल झाले भाव ११ हजार रुपये क्विंटल मिळाला. यावेळी सुद्धा तयारी सुरू आहे."- रामेश्वर अमनेरकर, हमदापूर

टॅग्स :farmingशेतीwardha-acवर्धा