शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांची विद्युत वितरण कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 00:26 IST

वीज वितरण कंपनी कृषी पंपाना नवीन वेळापत्रकानुसार वीज पुरवठा देत आहे. यामुळे शेतकºयांना नाहक त्रास सहन करीत शेतातील उभ्या पिकांना पाणी द्यावे लागत आहे.

ठळक मुद्देजुन्या वेळापत्रकाने भारनियमनाची मागणी : कनिष्ठ अभियंत्याला निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणी : वीज वितरण कंपनी कृषी पंपाना नवीन वेळापत्रकानुसार वीज पुरवठा देत आहे. यामुळे शेतकºयांना नाहक त्रास सहन करीत शेतातील उभ्या पिकांना पाणी द्यावे लागत आहे. शेतकरी हित जोपासून सुरू केलेले भारनियमन बंद करावे. तसे होत नसल्यास नवीन वेळापत्रकानुसार भारनियमन करण्याची मागणी केली. याबाबत वीज कार्यालयावर धडक देत शेतकºयांनी कनिष्ठ अभियंता नेवारे यांना निवेदन सादर केले.हिंगणी येथील उपकेंद्राने नुकतेच शेतीसाठी नवीन वेळापत्रक तयार करून भारनियमन सुरू केले. या वेळापत्रकानुसार महावितरण कंपनी शेतातील दिवसा वीजपुरवठा बंद करते तर रात्रीला सुरू ठेवते. परिणामी, शेतकºयांना रात्री शेतात जाऊन पिकांना पाणी द्यावे लागत आहे. अनेक शेतकरी मोटारपंप सुरू करून घरी परत येतात. महावितरण कंपनी रात्रीही वेळोवेळी वीज पुरवठा खंडित करते. यामुळे रात्री जागलीला जावे लागते. रबी हंगामाला सुरुवात झाली आहे. गहू व तुरीच्या पिकाला पाण्याची गरज आहे; पण ते देता येत नाही. खासगी कंपन्यांना २४ तास वीज देणारे महावितरण कृषी पंपांना वीज देण्यास कुचराई करीत असल्याने शेतकरी रोष व्यक्त करीत आहे. भारनियमन बंद करा, अन्यथा जुन्या वेळापत्रकाने वीजपुरवठा सुरू ठेवा, अशी मागणी शेतकºयांनी केली. निवेदन देताना नितीन निघडे, विजय डेकाटे, सातपुते, कांबळे, काळे, नागोसे आदी उपस्थित होते.