शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

वैरणासाठी शेतकऱ्यांची धडपड

By admin | Updated: April 5, 2015 02:02 IST

गव्हाची सवंगणी व मळणीच्या ऐन हंगामात ढगाळ वातावरणाची निर्मिती झाली़ यामुळे गहू उत्पादक शेतकऱ्यांनी लगबगीने हार्वेस्टरच्या साह्याने मळणी ..

घोराड : गव्हाची सवंगणी व मळणीच्या ऐन हंगामात ढगाळ वातावरणाची निर्मिती झाली़ यामुळे गहू उत्पादक शेतकऱ्यांनी लगबगीने हार्वेस्टरच्या साह्याने मळणी करून गहू घरी आणले़ यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला़ आता चाऱ्याचा प्रश्न निस्तारावा म्हणून शेतकरी धडपडत आहे़ हार्वेस्टरमधून पडलेल्या गव्हाच्या कांड्या उचलून गव्हांश तयार करण्याच्या कामात व्यस्त झाल्याचे दिसताहेत़हार्वेस्टरने झटपट मळणी होत असली तरी शेतकऱ्यांच्या घरी असलेल्या जनावरांना मिळणारा गव्हांश नाहीसा होतो; पण यावर मात करीत शेतात गव्हाच्या ओंबीतील दाणा निघाल्यानंतर उरलेला भाग शेतात पडतो़ हेच उचलण्याच्या कामाला शेतकरी व शेतमजूर लागले आहेत़ याला पुन्हा हडंबाच्या साह्याने बारिक करून यापासून गव्हांश (गव्हांडा) तयार करण्यात येत आहे. यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा खर्च करावा लागत असल्याचे दिसते़जनावरांसाठी वर्षभराच्या चाऱ्याची व्यवस्था शेतकऱ्याला करून ठेवावी लागते़ यासाठी सोयाबीनपासून मिळणारे कुटार, गव्हापासून गव्हांश, मका व ज्वारीपासून कुटार करून भरून ठेवले जात होते. यामुळे जनावरांच्या वैरणाचा प्रश्न सुटत होता. अलिकडे झटपट कापणी व मळणीचे दिवस आले असून अशा वैरणासाठी शहरातील गोपालक ग्रामीण भागात वैरण खरेदीसाठी भटकंती करताना दिसत आहेत़ हार्वेस्टरमुळे वैरणाचा प्रश्न निर्माण होत असताना यावरही शेतकरी मात करीत असल्याचे दिसून येते़ सध्या तालुक्यातील शेतकरी शेतातील गव्हाच्या कांड्या वेचण्यात व्यस्त असून गुरांच्या चाऱ्याची तजविज करून ठेवताना दिसतात़ यामुळे वैरण टंचाईची धग जाणवत नसल्याचेच दिसून येते़(वार्ताहर)टंचाईवर मात करण्यासाठी नवोपक्रमयंत्रांच्या साह्याने पिकांची सवंगणी केली जात असल्याने गुरांकरिता चारा राहत नाही़ यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट होताना दिसतो; पण तालुक्यातील शेतकऱ्यांनी यावरही मात केली आहे़ शेतकऱ्यांनी हार्वेस्टरद्वारे गव्हाची सवंगणी केली़ यात शेतात गव्हाच्या कांड्या विखुरलेल्या आहेत़ या गव्हाच्या कांड्या गोळा करण्याच्या कामात शेतकरी व्यस्त झाल्याचे दिसते़ शेतातील गव्हाच्या कांड्या गोळा करून त्या पुन्हा थ्रेशरमध्ये बारिक करून जनावरांकरिता गव्हांडा मिळविला जात असल्याचे दिसून येत आहे़ यामुळे गुरांच्या चाऱ्याची टंचाई जाणवत नाही़ तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी हा नवोपक्रम हाती घेतला असून खर्च मात्र करावा लागत आहे़