शहरं
Join us  
Trending Stories
1
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
2
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
3
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट
4
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
5
ENG vs IND : १२३ वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवण्याचं चॅलेंज; इथं पाहा टीम इंडियाचा रेकॉर्ड
6
वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत...
7
हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन
8
पतीशी भांडण करून दुसऱ्या खोलीत झोपली पत्नी; मध्यरात्री पतीला आली जाग, खोलीत डोकावून पाहताच... 
9
आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना भोजन मोफत 
10
'मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी', विधानसभेच्या कामकाजावर विरोधकांचा दिवसभरासाठी बहिष्कार
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताय? फक्त परतावा नका पाहू, 'या' १० गोष्टी तपासाच! अन्यथा पैसे जातील पाण्यात
12
५०० वर्षांनी गुरु-शनिचा पॉवरफूल योग: ९ राशींचे कल्याण, अपार लाभ; भरघोस भरभराट, बक्कळ पैसा!
13
'त्या' रात्री काय झालं? पतीला कसं मारलं? बॉयफ्रेंडसोबत पकडल्या गेलेल्या ९ मुलांच्या आईने 'असा' केला गुन्हा कबूल! 
14
कॉलर पकडली, फरफटत नेलं, बेदम मारलं; भाजपा नेत्याच्या समर्थकांची आयुक्तांना मारहाण
15
'आभाळमाया'तील चिंगीला असा मिळाला 'बाजीराव मस्तानी', सेटवर संजय भन्साळी चिडले तेव्हा...
16
फक्त एक फोन लीक झाला अन् 'या' देशाच्या पंतप्रधानांना पदावरून हटवलं; नेमकं काय घडलं?
17
कर्नाटक काँग्रेसमध्ये हालचालींना वेग! 'डीके शिवकुमार यांच्यासोबत १०० आमदार'; नेत्याच्या दाव्यामुळे हायकमांड बंगळुरुमध्ये पोहोचले
18
Shefali Jariwala : "परागला चौकशीला जावं लागेल", शेफालीच्या मैत्रिणीनं पोस्टमार्टम रिपोर्टबाबत केले खुलासे, म्हणाली - "काहीतरी गडबड.."
19
"केंद्रात सत्ता येताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालणार’’, काँग्रेसच्या बड्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत 
20
Sangareddy Pharma Company Blast: फॅक्ट्रीमध्ये ब्लास्ट, 'सिगाची'चा शेअर जोरदार आपटला; प्लांट बंद, उत्पादनावर मोठं संकट

शेतकरी पितापुत्रास ग्रेडरची मारहाण

By admin | Updated: January 14, 2015 23:12 IST

कापूस लावून घेण्यात व भाव देण्यावरून झालेल्या वादात शेतकरी पितापुत्रास मारहाण करण्यात आली. हा प्रकार येथील गुरुकृपा कॉटन मिल परिसरात मंगळवारी दुपारच्या सुमारास घडला.

मारहाण करणाऱ्यांना पोलिसांचे अभय : गुरुकृपा कॉटन जिनिंगमधील प्रकार समुद्रपूर : कापूस लावून घेण्यात व भाव देण्यावरून झालेल्या वादात शेतकरी पितापुत्रास मारहाण करण्यात आली. हा प्रकार येथील गुरुकृपा कॉटन मिल परिसरात मंगळवारी दुपारच्या सुमारास घडला. याप्रकरणी पोलिसांनी त्यांची तक्रार न घेता मारहाण करणाऱ्यांची तक्रार घेत त्या पीडित शेतकरी पिता-पुत्राला सायंकाळी गजाआड केल्याचा धक्कादायक प्रकार येथे घडला. यामुळे सर्वत्र संतप्त भावना व्यक्त होत आहे.प्राप्त माहितीनुसार, कानकाटी (कांढळी) येथील गुरूकृपा कॉटन जिनिंगमध्ये सीसीआयची कापूस खरेदी सुरू होती. चाकूर येथील शेतकरी देवराव कुबडे यांचा मुलगा संदीप याने दोन दिवसा अगोदर सदर जिनिंगमध्ये कापसाची बंडी आणली होती, परंतु कापूस लावून घेण्यास व भाव देण्यात संबंधित ग्रेडर शिवाजी पंडीत टाळाटाळ करीत असल्याचे समजते. यामुळे त्रस्त झालेल्या शेतकरी पिता-पुत्राची ग्रेडरशी शाब्दिक चकमक उडाली. वादाचे पर्यवसान त्या पिता-पुत्रास हाणामारीत झाले. या दोन्ही शेतकऱ्यांना दोन ग्रेडर व जिन मालक व काटेवाले यांनी बेदम मारहाण केली. यात शेतकरी देवराव कुबडे यांच्या डोक्याला इजा झाली. सदर घटनेप्रकरणी पितापुत्र समुद्रपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता पोलिसांनी त्यांची तक्रार घेण्यास नकार दिला. उलट गे्रडरच्या तक्रारीवरून त्या शेतकरी पित्रा-पत्रावरच कलम ३५३, २२३, ३४ कलमान्वये कारवाई करीत दोघांनाही गजाआड करण्यात आले.आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात न्याय मागायला गेलेल्या शेतकरी पितापुत्रावरच समुद्रपूर पोलिसांनी कारवाई केली. त्यामुळे सर्वत्र संतप्त प्रतिक्रीया उमटत असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.(तालुका प्रतिनिधी)