शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

खासगी कापूस खरेदीत शेतकऱ्यांना थेट हजाराचा फटका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 17:13 IST

Wardha News Cotton सध्या विदर्भात कापसाच्या मोठ्या बाजारपेठेत हमीभावापेक्षा १ हजार ते १ हजार २०० रुपये कमी दराने कापसाची खरेदी केली जात आहे. याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसलाआहे. 

ठळक मुद्देविदर्भात सीसीआय व पणनची खरेदी लांबलीव्यापाऱ्यांच्या केंद्रावर उसळतेय गर्दी

लाेकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विदर्भातील शेतकऱ्याचे नगदी पीक असलेल्या कापसाची शासकीय स्तरावर सीसीआय व कापूस पणन महासंघ यांच्याकडून होणारी खरेदी लांबल्याने सध्या विदर्भात कापसाच्या मोठ्या बाजारपेठेत हमीभावापेक्षा १ हजार ते १ हजार २०० रुपये कमी दराने कापसाची खरेदी केली जात आहे. याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसला असून यंदा सोयाबीनचे उत्पादन घटल्याने कापूस विकण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. 

राज्यात उत्पादित होणारा ७७ टक्के कापूस एकट्या विदर्भात पिकतो. नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, अकोला, बुलढाणा, वाशीम या जिल्ह्यात कापसाचे मोठ्या प्रमाणावर उत्पन्न होते. वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातील कापसाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही मोठी मागणी आहे. दसऱ्यानंतर कापूस निघण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या काॅटन कार्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय)  व राज्य सरकारचे  कापूस पणन महासंघ यांनी विदर्भात खरेदी सुरू केलेली नाही. यांचे केंद्र निश्चित झाले असून  खरेदी दिवाळीनंतर सुरू होणार आहे. यंदा कीड व अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे उत्पादन घटले. त्यामुळे अनेक शेतकरी आता निघालेला कापूस विकण्यासाठी बाजारात दाखल झाले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव, वणी, वर्धा जिल्ह्यात समुद्रपूर, हिंगणघाट, देवळी, आर्वी आदी ठिकाणी खासगी व्यापाऱ्यांची खरेदी सुरू झाली आहे. येथे कापसाला ४ हजार २०० ते ४ हजार ७०० रुपये क्विंटल भाव दिला जात आहे. केंद्र सरकारने यंदा कापसाला ५ हजार ८०० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. परंतु, केंद्र सुरू केेले नसल्याने शेतकऱ्यांना  खासगी व्यापाऱ्यांकडे कापूस विकताना क्विंटलमागे थेट १ हजार ते १ हजार २०० रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे.

आर्द्रतेच्या मुद्यामुळे सीसीआयची खरेदी लांबलीविदर्भात सीसीआय मोठ्या प्रमाणावर कापूस खरेदी करते. अकोला येथून सीसीआयचा सर्व कारभार चालविला जातो. मात्र, विदर्भात अवकाळी पाऊस झाल्याने कापसातील आर्द्रतेचे प्रमाण १५ टक्क्यांपर्यंत गेले आहे, असे कारण देत सीसीआयने दसऱ्यानंतर सुरू होणारी कापूस खरेदी लांबणीवर टाकली आहे. यापूर्वीच सीसीआयने खरेदी केंद्राची निविदा प्रक्रीया पूर्ण केली आहे. अनेक बाजार समित्यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रियाही पूर्ण  केली आहे. सीसीआय १२ टक्क्यांपेक्षा कमी आर्द्रतेचा कापूस खरेदी करते. त्यामुळेच ते १२ टक्के आर्द्रता येण्याची प्रतीक्षा करीत असावे, असा जाणकारांचा अंदाज आहे.  

टॅग्स :cottonकापूस