शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

शेतकऱ्यांनी उतरविला १४.४८ कोटींचा पीक विमा

By admin | Updated: November 14, 2016 00:53 IST

हवामान आधारित आणि आता पंतप्रधान पीक विमा योजना शासनाकडून राबविली जात आहे.

८० हजार १२५ प्रकरणे : ९७,०९३ हेक्टर क्षेत्राचा समावेशप्रशांत हेलोंडे  वर्धाहवामान आधारित आणि आता पंतप्रधान पीक विमा योजना शासनाकडून राबविली जात आहे. जिल्ह्यातील कर्जदार आणि गैरकर्जदार शेतकऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेतला आहे. वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचा विमा रिलायन्स या विमा कंपनीकडून काढला जात आहे. खरीप हंगामामध्ये जिल्ह्यात सुमारे ५६ हजारांवर कर्जदार तर ५ हजार २८८ गैरकर्जदार शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांनी तब्बल १४ कोटी ४८ लाख रुपयांचा पीक विमा काढलेला आहे. यातील अनेक शेतकऱ्यांना सोयाबीन पिकात नुकसान सहन करावे लागल्याने त्यांनी विमा परताव्यासाठी अर्ज केल्याची माहिती आहे. विदर्भातील बहुतांश शेती निसर्गावर अवलंबून आहे. काही वर्षांत सिंचन क्षेत्रात वाढ झाली असली तरी पावसाच्या कमी-अधिक प्रमाणाचा शेतातील पिकांवर परिणाम होतो. यामुळेच शासनाकडून पीक विमा योजना राबविल्या जातात. पूर्वी हवामान आधारित पीक विमा योजना होती. आता पंतप्रधान पीक विमा योजना राबविली जात आहे. या योजनेत शेतकऱ्यांना एकदाच विमा हप्ता भरावा लागतो. पिकांचे निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसान झाले तरी विम्याच्या परताव्यासाठी प्रस्ताव सादर करता येतो. यासाठी कृषी विभागाच्यावतीने विमा कंपनीच्या प्रतिनिधीच्या हजेरीत सर्वेक्षण केले जाते. सदर प्रतिनिधी उपलब्ध होत नसल्यास कृषी विभागाचे सर्वेक्षण ग्राह्य धरले जाते. या सुविधेमुळे यंदा जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला आहे. कर्जदार शेतकऱ्यांना तर पिकांचा विमा काढणे बंधनकारक करण्यात आले आहे; पण जिल्ह्यात गैरकर्जदार शेतकऱ्यांनीही विमा उतरविल्याचे दिसून येत आहे.यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील सुमारे ५६ हजारांवर शेतकऱ्यांना बँकांकडून पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. या शेतकऱ्यांनी आपल्या सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांचा विमा उतरविला आहे. विमा हप्त्याची रक्कम वेगवेगळी असल्याने एका शेतकऱ्याची दोन ते तीन वेळा नोंद होत असल्याचे लीड बँकेकडून सांगण्यात आले आहे. हा आकडा विचारात घेतला तर जिल्ह्यातील ९१ हजार ५९५.८ हेक्टर क्षेत्रातील पिकांचा विमा काढण्यात आला आहे. यासाठी ७४ हजार ८३७ प्रकरणांमध्ये कर्जदार असलेल्या शेतकऱ्यांनी १३ कोटी ७६ लाख, ४५ हजार ९४३ रुपयांचा विमा हप्ता अदा केला आहे. गैरकर्जदार शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विमा योजनेचा लाभ घेतला आहे. यात ५ हजार २८८ शेतकऱ्यांनी आपल्या ५ हजार ४९७.७५८ हेक्टर क्षेत्रातील पिकांसाठी ७२ लाख १२ हजार ७१३ रुपयांचा विमा हप्ता अदा केला आहे. एकूण जिल्ह्यातील ८० हजार १२५ प्रकरणांमध्ये १४ कोटी ४८ लाख ५८ हजार ६५६ रुपयांचा विमा हप्ता संबंधित कंपनीला अदा करण्यात आला आहे. विमा योजनेमुळे शेतकऱ्यांच्या पिकांना नुकसान भरपाईची हमी मिळाली आहे. असे असले तरी शेतकऱ्यांना शासकीय यंत्रणांचे सहकार्य मिळणे अत्यंत गरजेचे झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसान झाले आणि शासकीय यंत्रणेने पंचनामाच केला नाही तर शेतकऱ्यांना विम्याचा परतावा मिळणे कठीण होते. यामुळे शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळवून देण्याकरिता कृषी विभाग, महसूल विभाग आणि विमा कंपनीने पूढाकार घेत नुकसानाचा पंचनामा करून घेत सहकार्य करणे गरजेचे झाले आहे.