शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचे आयुक्तांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 21:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीय राजमार्ग क्र. ३६१ मध्ये संपादित केलेल्या आणि होणाऱ्या जमिनीचा मोबदला चौरस मिटर ...

ठळक मुद्देभूमिपूत्र संघर्ष वाहिनीचे नेतृत्व : शेतकºयांचा चौरस मिटर प्रमाणे रक्कम द्या

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीय राजमार्ग क्र. ३६१ मध्ये संपादित केलेल्या आणि होणाऱ्या जमिनीचा मोबदला चौरस मिटर प्रमाणे देण्यात यावा, अशी मागणी सालोड हिरापूर येथील शेतकऱ्यांसह भूमिपूत्र संघर्ष वाहिनीने सोमवारी विभागीय आयुक्त नागपूर संजीवकुमार यांची भेट घेवून त्यांच्याकडे केली. याबाबतचे निवेदन विभागीय आयुक्तांना देण्यात आले.यात म्हटले आहे की, राष्ट्रीय राजमार्ग क्र. ३६१ मध्ये संपादित होणाऱ्या जमिनीचा दर मोबदल्याच्या स्वरूपात हेक्टर आर प्रमाणे देण्यात आलेला आहे. परंतु याच प्रकल्पासाठी संपूर्ण यवतमाळ, लातूर, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नॅशनल हायवेज अ‍ॅक्ट १९५६ च्या तरतुदीनुसार चौरस मिटर व त्यावरील चार गुणक प्रमाणे मोबदला देण्यात आला आहे. याबाबत शेतकरी व भूमिपुत्र संघर्ष वाहिनीने आयुक्ताना यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील खडका (भूसंपादन मामला क्र. ६/४७/२०१५-१६) येथील पारित करण्यात आलेला अंतिम निवाडा सादर केला आहे. वर्धा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे. शेती संपादित करण्यात आल्यामुळे शेतकºयांचे रोजगाराचे साधन हिरावले जाणार आहे.या आंदोलनाचे नेतृत्व भूमिपुत्र संषर्घ वाहिनीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित फाळके पाटील यांनी केले. यावेळी शेतकरी उदय देशमुख, संजय मेहत्रे, अरविंद देशमुख, सतीश मेहत्रे, अविनाश कुबडे, चंद्रकांत मेहत्रे, धनंजय चरडे, किशोर मडावी, प्रताप चरडे, जगदीश बदरीया, भूजंग वाघ, निलेश वाघ, विनोद फटींग, लक्ष्मण बदरिया, अशोक रोडे, रमेश बदरिया, बाबाराव वांदीले, कुणाल देशमुख, दत्ता राऊत आदी उपस्थित होते.यावेळी निवेदन देताना अभिजित फाळके म्हणाले की, वर्धा जिल्ह्यातील राजकीय व्यवस्थेच्या नाकाखाली नॅशनल हायवे जमीन अधिग्रहण प्रकरणात शेतकºयांचे शोषण झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले असून सर्र्व चौरस गुणकानुसार अधिग्रहणाचे काम झाले असताना येथे हेक्टरी मापाने अधिग्रहण का ? असा सवाल आहे.