शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅग्रो कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:38 IST

सालोड (हि.) येथील शेतकऱ्यांची नागपूर येथील अ‍ॅग्रो कंपनीच्या व्यापाऱ्यांकडून फसवणूक झाल्यासंदर्भातील

आमदारांना निवेदन : सालोड (हिरापूर) येथील प्रकार लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : सालोड (हि.) येथील शेतकऱ्यांची नागपूर येथील अ‍ॅग्रो कंपनीच्या व्यापाऱ्यांकडून फसवणूक झाल्यासंदर्भातील तक्रार गुरूवारी शेतकऱ्यांनी आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या मार्फत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे. या तक्रारीत शेतकरी नत्थू सोनटक्के, अशोक धानकुटे, दादाराव वाघमारे, नत्थूजी धानकुटे, गणेश मुते, दिलीप क्षीरसागर, सुनील रागीट, हरिभाऊ जुडे, वासुदेव जुडे, कमला साखरे, रितेश घोडे, विठ्ठल तिमांडे, प्रदीप वाघ आदींनी म्हटले आहे की, आमच्या शेतातील तूर व चना नागपूर येथील अ‍ॅग्रो व्यापारी सुदर्शन राव यांना दिला. त्यांनी त्या मालाच्या मोबदल्यात आम्हाला धनादेशाद्वारे रक्कम देतो म्हणून नागपूरच्या दोन बँकेचे धनादेश दिले. मात्र ते धनादेश वठले नाही. त्याचे पैसे मिळाले नाही. आमची फसवणूक झाली आहे. या हंगामात शेतीच्या कामासाठी पैसे नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. याप्रकरणी न्याय देण्यात यावा, अशी मागणी या शेतकऱ्यांनी आमदार डॉ. पंकज भोयर यांची भेट घेवून केली. तसेच पालकमंत्र्याचे निवेदन त्यांच्याकडे सादर केले. उद्या २० जुलै रोजी हे शेतकरी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेवून आपली व्यथा मांडणार आहेत.