शहरं
Join us  
Trending Stories
1
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
2
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
3
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
4
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
5
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
6
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
7
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
8
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
9
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक
10
ई-बस प्रवाशांसाठी STकडून मासिक, त्रैमासिक पास योजना सुरू; प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
11
महिलांसाठी आनंदाची बातमी! 'या' राज्यात आता १२ दिवसांची मासिक पाळी रजा मिळणार, सरकारची घोषणा
12
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
13
Nobel Prize : साहित्यातील नोबेल पुरस्काराची घोषणा, हंगेरीचे लास्झलो क्रास्नाहोरकाई ठरले मानकरी
14
Astro Tips: १० ऑक्टोबरला रात्री ठीक १० वाजून १० मिनिटांनी इच्छापूर्तीसाठी करा 'हे' काम!
15
बाजाराचं जोरदार कमबॅक! एका दिवसात गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फायदा, 'हे' शेअर्स होते टॉप गेनर्स
16
Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं
17
IAS Ambika Raina : कमाल! स्वित्झर्लंडची लाखोंची नोकरी सोडून स्वप्न केलं साकार; दोनदा अपयश, तिसऱ्यांदा झाली IAS
18
"कंटेनर वेगाने मागे आला असता तर...", अपघातातून थोडक्यात बचावली रुपाली भोसले, सांगितला भयानक प्रसंग
19
बांगलादेशचं पाकिस्तानच्या पावलावर पाऊल! चीनकडून खरेदी करणार १५००० कोटींची २० लढाऊ विमाने
20
Social Viral: बीडच्या ZP शाळेचा पॅटर्न: मधल्या सुट्टीत सुलेखन आणि रंगोळीचे प्रशिक्षण, सरपंचांचेही पाठबळ!

शेतकऱ्यांचे ‘भीक मांगो’ आंदोलन

By admin | Updated: February 6, 2016 02:15 IST

येथील श्रीकृष्ण जिनिंग प्रेसिंगचे मालक सुनील टालाटुले यांनी ४०० शेतकऱ्यांचे आठ कोटी रुपये अजूनपर्यंत दिले नाही.

आठ कोटी थकीत : जमा झालेले पैसे पाठविले आरएसएसलासेलू : येथील श्रीकृष्ण जिनिंग प्रेसिंगचे मालक सुनील टालाटुले यांनी ४०० शेतकऱ्यांचे आठ कोटी रुपये अजूनपर्यंत दिले नाही. त्याविरूद्ध आवाज उठविण्यासाठी सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची सभा व सिंदी शहरात भीक मांगो आंदोलन केले. यात शेतकरी, शेतमजूर व विद्यार्थी सहभागी झाले होते.आरएसएसचा कार्यकर्ता असल्याचे सांगत टालाटुले राज्य व केंद्रातील भाजपा शासनाचा फायदा घेत असल्याचे शेतकरी सांगत आहे. त्याला पाठीराखण करणाऱ्या आरएसएससाठी शेतकऱ्यांनी सदर भीक मांगो आंदोलन करीत हा पैसा आरएसएसला पाठविला. ‘४२० सुनील टालाटुले’ मुर्दाबादच्या घोषणाही शेतकऱ्यांनी यावेळी दिल्या. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ गाणी सादर केली. सिंदी कृउबासच्या परिसरात झालेल्या सभेला राष्ट्रीय प्रभारी किसान खेत मजदूर काँग्रेसचे अविनाश काकडे यांच्यासह अनेकांनी मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी न्याय मिळवून देण्यासाठी यावेळी सभेत सर्वकष चर्चा झाली. भीकमांगो आंदोलनात किसान अधिकार अभियानचे अविनाश काकडे, डॉ. नूतन माळवी, डॉ. मोहन सोमलकर, रामनारायण पाठक, सेलू, संदीप चिमुरकर, रामनारायण पटेल, यदुवंश प्रणय, विजेंद्र निशांत आदीसह शेतकरी, विद्यार्थी आदींनी सक्रीय सहभाग घेतला. सुनील टालाटुले याने ४०० शेतकऱ्यांचे आठ कोटी रूपये अडविल्याने व जिनिंग प्रेसिंगला कुलूप लावल्याने पोलिसांनी त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पण कापूस उत्पादकांना त्यांचे चुकारे अद्यापन न मिळाल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहे. त्यामुळे सदर भीकमांगो आंदोलन करण्यात आले.(तालुका प्रतिनिधी)