शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे खाते कर्जातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 23:46 IST

शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता राज्य शासनाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंमलात आणली. या कर्जमाफीच्या घोषणेदरम्यान जिल्ह्यात उडालेल्या गोंधळानंतर तीन याद्या जाहीर झाल्या.

ठळक मुद्देतीन याद्या जाहीर : ३४ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम झाली वळती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता राज्य शासनाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंमलात आणली. या कर्जमाफीच्या घोषणेदरम्यान जिल्ह्यात उडालेल्या गोंधळानंतर तीन याद्या जाहीर झाल्या. या याद्यात नाव असलेल्या एकूण ३४ हजार ५०९ शेतकऱ्यांचे बँक खात्यात रक्क्म आली तर २४ हजार ३४९ शेतकऱ्यांना रकमेची प्रतीक्षा आहे. असे असले तरी शेतकऱ्यांचे खाते कर्जातच असल्याचे दिसते.कर्जमाफीची योजना जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील तब्बल ९८ हजार शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज केले होते. या अर्जांची छाननी केल्यानंतर त्यांच्या ग्रीन, येलो आणि रेड अशा तीन याद्या तयार करण्यात आल्या. या याद्यानुसार काम सुरू करण्यात आले असून याद्या जाहीर करण्याचे काम सुरू आहे. वर्धेत आतापर्यंत एकूण ५८ हजार ८५७ शेतकऱ्यांना ४५३.७७ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. मात्र त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणे बाकी आहे.कर्जमाफीनंतरही सातबारावर कर्जाचा बोजा; व्याजाचा बडगा कायमशेतकºयांकरिता कर्जमाफीची योजना जाहीर होणे आणि त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणे यात मोठा कालावधी गेला. या काळात बँकांनी शेतकऱ्यांच्या खात्यातील कर्जावर व्याजाची आकारणी केली. शासनाने पाठविलेल्या याद्यात त्या काळातील कर्जाचा उल्लेख होता. मात्र कर्जमाफीची रक्कम बँकेकडे गेल्यावर आकारलेले व्याज शिल्लक राहत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे खाते कर्जमुक्त नाही तर कर्जयुक्त राहत आहे. यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्षात याचा लाभ झाला नसल्याची ओरड ग्रामीण भागात होत आहे. या कालावधीत चढलेले व्याज कोण भरणार असा सवाल शेतकऱ्यांकडून होत आहे.कर्जमाफीच्या जाहीर यादीत वर्धा जिल्ह्यातील ५५ हजार २७२ शेतकरी दीड लाख रुपयांच्या आतील आहेत. त्यांची थकबाकी ४३७.२६ कोटी रुपये आहे. या पैकी ३२ हजार ७९५ शेतकऱ्यांच्या खात्यात २०७.५६ कोटी रुपये जमा झाले आहेत. उर्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप रक्कम आली नसून त्यांना कर्जमाफीची अद्याप प्रतीक्षा आहे.नियमित कर्ज भरणाऱ्या १ हजार ९९० शेतकऱ्यांना ४.१७ कोटी रुपयांची माफी मिळाली आहे. यातील केवळ १ हजार ७११ शेतकऱ्याच्या खात्यात ३ कोटी ५९ कोटी रुपये जमा करण्यात आले आहे. यामुळे नियमित कर्जभरणाऱ्या उर्वरीत २०० शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात रक्कम येण्याकरिता काही काळ प्रतीक्षाच करावी लागणार आहे.