शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी चिंतेत : शासन आदेशाला केराची टोपली

By admin | Updated: July 14, 2014 02:26 IST

नैसर्गिक प्रकोपात उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याच्या

अलाहाबाद बँकेचे कर्ज पुनर्गठनात हात वरसंजय बिन्नोड विजयगोपालनैसर्गिक प्रकोपात उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याच्या मदतीकरिता शासनाने कर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेश बँकाना दिले. मात्र कर्ज पुनर्गठणात अलाहाबाद बँकेने हात वर केले आहे. या बाबत शेतकऱ्यांनी बँक व्यवस्थापकांना विचारणा केली असता अशी कुठलीही सुचना नसल्याचे सांगण्यात येत आहे. गत वर्षी खरीपात अतीवृष्टी आणि रबीत गारपीट झाले. दोन्ही हंगाम उध्वस्त झाले. निसर्गाच्या या प्रकोपाने बऱ्याच शेतकऱ्याना कर्ज भरणे अशक्य झाले. अशात थकबाकीदार असल्याने शेतकऱ्यांना कर्ज देण्यास बँकांनी नकार दिला. अशा स्थितीत शासनाने ३० जूनपर्यंत कर्जाची परतफेड करू न शकणाऱ्या शेतकऱ्याच्या कर्जाचे पुनर्गठण करण्याचे आदेश दिले. शासनाच्या या निर्णयाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या; पण विजयगोपाल येथील शेतकरी सुधाकर झोपाटे यांच्याकडे अलाहाबाद बँकेचे कर्ज असल्याने त्या कर्जाचे पुर्नगठन करण्याकरिता बँकेत गेले. यावेळी बॅक व्यवस्थापकाने असा कुठलाही आदेश बँकेला नाही म्हणून कर्ज पुनर्गठणासाठी हात वर केले आहे. बँक मुख्यमंत्र्यांचा आदेशही पाळायला तयार नाही, त्यामुळे शेतकरी हतबल झाल्याचे दिसत आहे. यावर्षीही पाऊस लांबल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. दुबार पेरणीचे संकट त्याच्यावर आले आहे. पुन्हा कर्ज मिळाल्यास शेतकऱ्याना मोलाची मदत होणार आहे. अलाहाबाद बँकेने हात वर केल्याने शेतकऱ्याना सावकराचे उंबरठे झिजवावे लागत आहे. माहागडे बियाणे नष्ट झाल्यानंतर आता दुबार पेरणीसाठी बियाणे आणावे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यातच शासनाने पुनर्गठणाच्या आदेशाला अलाहाबाद बॅकेच्या येथील शाखेने हात वर केल्याने शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ झाली आहे.शेतकरी सावकाराच्या दारीपावसाने दगा दिल्याने शेतकऱ्यांनी दुबार पेरणीची वेळ आली आहे. अशात बँकांनी दिलेले कर्ज पहिल्या पेरणीतच गेले. शिवाय आजा कर्जावे पुनर्गठन करण्यास बँक नकार देत आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठी आर्थिक अडचण येत आहे. यामुळे शेतकरी सावकाराच्या दारी जात आहे.अजूनपर्यंत कर्ज पुनर्गठनाचा आदेश बँकेला म्हणजे मला मिळाला नाही. असा आदेश आल्यास शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्रगठन नियमाप्रमाणे करण्यात येईल.- महेश यादव, अलहाबाद बॅक मॅनेजर, विजयगोपाल.