शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
4
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
5
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
6
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
7
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
8
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
9
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
10
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
11
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
12
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
13
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
14
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
15
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
16
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
17
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
18
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
19
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
20
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी धडकले तहसीलवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 22:08 IST

सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी एकत्र येत सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अ‍ॅड. सुधीर कोठारी यांच्या नेतृत्त्वात तहसील कार्यालयावर धडक दिली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले. त्यानंतर मोर्चाचे जाहीर सभेत रुपांतरण झाले. जाहीर सभेदरम्यान मनोगत व्यक्त करताना मान्यवरांनी सरकारवर कडाडून टिका केली.

ठळक मुद्देराकाँचे आंदोलन : जाहीर सभेतून सरकारवर टीका

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी एकत्र येत सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अ‍ॅड. सुधीर कोठारी यांच्या नेतृत्त्वात तहसील कार्यालयावर धडक दिली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले. त्यानंतर मोर्चाचे जाहीर सभेत रुपांतरण झाले. जाहीर सभेदरम्यान मनोगत व्यक्त करताना मान्यवरांनी सरकारवर कडाडून टिका केली.शेतातील उभ्या पिकांना ओलीत करण्यासाठी कृषीपंपांना दररोज सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत विद्युत पुरवठा देण्यात यावा. संपूर्ण वर्धा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा, नैसर्गिक आपत्तीच्या काळात उद्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये अनुदान देण्यात यावे, मागील हंगामात जाहीर केलेल्या गुलाबी बोंडअळीचे अनुदान उर्वरित शेतकºयांच्या बँक खात्या तात्काळ जमा करण्यात यावे. यंदाच्या हंगामातही गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सर्वेक्षण करून कपाशी उत्पादकांना शासकीय मदत देण्यात यावी. आधारभूत हमी भाव दराने शासकीय खरेदी केंद्र वर्षभर सुरू ठेवण्यात यावेत, शेतमाल तारण योजनेत सहभागी शेतकऱ्यांना आधारभूत दराचे संरक्षण देण्यात यावे, धाम प्रकल्पाचे पाणी सिचनासाठी सोडण्यात यावे. गामीण भागातील रस्त्यांची दुरूस्ती करून नवीन सिमेंट रस्ते तयार करण्यात यावे. सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी आदी मागण्या मोर्चाच्या माध्यमातून रेटण्यात आल्या. मोर्चाने शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करून तहसील कार्यालय गाठले. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार दीपक करंडे यांनी स्विकारले. जाहीर सभेदरम्यान शहीदांना आदरांजली अर्पण करण्यात आली. मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश महासचिव किशोर माथनकर, जिल्हा अध्यक्ष सुनील राऊत, वर्षा निकम, हिम्मत चतुर, अशोक वादिले, आफताब खान, रमेश भोयर, सुरेंद्र कुकेकार, हरीश वडतकर,पांडुरंग निबालकर, राजु चंदनखेडे, किशोर गाठे, राजू चाफले, डॉ. निर्मेश कोठारी, नरेंद्र थोरात, गंगाधर हिवांज, अरुण बकाल, हेमंत पाहुणे, बबलू सांगळे, गणेश वैरागडे, वामन डभारे, पिंटू सोनवणे, प्रशांत बोरकुटे, दीपक पंधरे, पांडुरंग बादले, जनार्धन हुलके, शालीक वैद्य, रामभाऊ चौधरी, आशीष अंड्रस्कर, शांतीलाल गांधी, चंदू बादले, मधुकर कामडी, मधुकर डंभारे, उत्तम भोयर, हरिष काळे, भूषण पिसे, नगरसेवक धनंजय बकाने, प्रकाश राऊत, विनोद झाडे आदी सहभागी झाले होते.हे सरकार उद्योगपतींचेच -कोठारीया सरकारला शेतकऱ्यांची गरज नाही. तो मेला तरी चालेल असेच सद्याच्या केंद्र व राज्य सरकारचे धोरण असल्याचे दिसून येते. केवळ सिमेंट रस्त्याचे भूमिपुजन करून काम सुरू अन् रस्ता बंद अशी या सरकारची अवस्था झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत हे सरकार हद्दपार केल्याशिवाय शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार नाही. या देशात शरद पवार यांच्या रुपाने एकमेव जाणता राजा आहे. त्यांनी ५६ हजार कोटींची कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा दिला होता. याउलट हे सरकार आहे. सध्याच्या सरकारकडून कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांनाच वेठीस धरले जात आहे. विद्यमान सरकारने निवडणुकीच्यावेळी शेतकºयांसह जनतेला विविध आश्वासने दिली होती. याच आश्वासनांच्या जोरावर भाजपा सत्तारुढ झाली. मात्र, सत्ता मिळताच या गोरगरीब व शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून देण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर उद्योगपदींचे हित जोपासले जात आहे. येत्या निवडणुकीत या सरकारला हद्दपार करण्याचे आवाहन यावेळी शेतकरी नेता अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी सांगितले.भाजपा सरकारला घरचा रस्ता दाखवा -निकमच्या सरकारने शेतकऱ्यांची दयनीय अवस्था केली आहे. शेतकºयांना वेठीस धरणाऱ्या सरकारला घरी पाठविणे गरजेचे असून सत्ताधाऱ्यांना निवडणुकीत घरचा रस्ता शेतकºयांनीच दाखवावा, असे आवाहन राकाँच्या निरीक्षका वर्षा निकम यांनी केले.