शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कॉल सेंटर आणि संकेतस्थळावरून अनेकांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 00:11 IST

बनावट कॉल सेंटर चालवून व बनावट संकेतस्थळाच्या मदतीने बेरोजगार युवकांना लुटणाºया मास्टर मार्इंडला दिल्ली येथून वर्धा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्देदिल्ली येथील दोघांना अटक : स्थानिक गुन्हेशाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बनावट कॉल सेंटर चालवून व बनावट संकेतस्थळाच्या मदतीने बेरोजगार युवकांना लुटणाºया मास्टर मार्इंडला दिल्ली येथून वर्धा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. विपुल विनोद अरोरा (२१), तसेच हिमांशू रवी अरोरा (२४) दोन्ही रा. दिल्ली अशी अटकेतील आरोपींची नावे असल्याचे सांगण्यात आले.पोलीस सूत्रांनुसार, १८ सप्टेंबर २०१७ ला शेख आबीद हुसैन शेख खुर्शीद याला तब्बल १.६० लाख रुपयांचा आॅनलाईन गंडा घालण्यात आला होता. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून सदरचा गुन्हा नोंद करून तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान मिळालेल्या सुगाव्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दिल्ली येथे रवाना झाले. येथे तांत्रिक माहितीवरून एका मोबाईल दुकानातून एक व्यक्ती दुसºयाच्या नावाने सीम विकत घेवून ते कार्ड कॉल सेंटरमध्ये वापरण्याकरिता घेवून जातो अशी माहिती मिळाली. त्या आधारे सदर दुकानाजवळ सापळा रचून विपुल विनोद अरोरा याला ताब्यात घेण्यात आले. त्याला पोलिसी हिसका दाखविला असता त्याने कॉल सेंटरचा मालक हिमांशू अरोरा बाबतची माहिती दिली. या माहितीवरून त्यालाही अटक करून वर्धेत आणण्यात आले. सदर दोन्ही आरोपींच्या ताब्यातून बनावट कॉल सेंंटरवर वापरलेले एकूण ३० मोबाईल, चार्जर, बॅग व कार्यालयाचे कागदपत्र असा एकूण १ लाख ९२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने ठोठावली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेल्या सदर दोन्ही आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.सदर कारवाई पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस यांच्या मार्गदर्शनात तपासी अधिकारी रामनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय मगर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पराग पोटे, सहायक पोलीस निरीक्षक सचिन यादव, पीएसएय उचल मलकापुरे, सहायक फौजदार नामदेव किटे, पांडुरंग कामटे, जमादार नरेंद्र डहाके, वैभव कट्टोजवार, आकाश चुंगडे, अमित शुक्ला, सागर सांगोळे, नरेंद्र कांबळे, सचिन खैरकर, शिल्पा राऊत यांनी केली. तसेच कुलदीप टांकसाळे, दिनेश बोथकर, अनूप कावळे, अक्षय राऊत, निलेश कट्टोजवार यांनी तांत्रिक सहाय्य केले. खोटी बतावणी करणाºयांवर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.