शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दोन मार्गांवर दीड कोटींची अतिरिक्त भाडे वसुली

By admin | Updated: June 17, 2017 00:36 IST

येथील बसस्थानक ते वायगाव (निपाणी) चौरस्ता मार्गे वर्धा बस स्थानकाचे अंतर प्रत्यक्षात

 राज्य परिवहन महामंडळाचा प्रताप : वर्धा व जाम प्रवासी अंतराच्या फेरमोजणीची गरज भास्कर कलोडे । लोकमत न्यूज नेटवर्क हिंगणघाट : येथील बसस्थानक ते वायगाव (निपाणी) चौरस्ता मार्गे वर्धा बस स्थानकाचे अंतर प्रत्यक्षात ४१ किमी असतांना ते ४२ पेक्षा अधिक किलोमीटर दाखवून प्रति प्रवासी एक टप्याचे ६ रुपए ३० पैसे अधिक वसूल केल्या जात आहे. असाच प्रकार हिंगणघाट जाम चौरस्ता प्रवासासाठी अर्ध्या टप्प्याचे भाडे अधिक घेतल्या जात आहे. यातून वर्षांला जवळपास दीड कोटींच्या अतिरिक्त भाडे वसुलीचा फटका प्रवाशांना बसत आहे. त्यामुळे या दोन्ही प्रवासी अंतराची फेरमोजनी करून प्रवाशांना दिलासा देण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. वर्धा हे जिल्ह्याचे ठिकाण असून अहेरी, चंद्रपूर, राजुरा, गडचिरोली, वरोरा, वणीकडुन हिंगणघाट मार्गे वर्धा, परतवाडा, पुलगाव, शिर्डी, औरंगाबाद, अकोला, अमरावती, शेगांव, दर्यापूर, आर्वी, यवतमाळ, आष्टी, आकोटकडे आवागमन करणाऱ्या ११८ बसफेरीद्वारे दररोज जवळपास ५ हजार प्रवाशांचे आवागमन होते आहे. प्रती प्रवासी सव्वा सहा रुपये प्रमाणे दररोज ३३ हजार तर वर्षाला अंदाजे १ कोटी २० लाखांचे अतिरिक्त प्रवासी भाडे वसुली हिंगणघाट वर्धा मार्गावर राज्य परिवहन महामंडळाकडून होत आहे. पूर्वी हिंगणघाट बस स्थानकातून सुटणारी बस वायगाव बस स्थानकावरुन चौरस्ता मार्गे वर्धा बस स्थानक जात असताना त्याचे अंतर ४५.३ किमी. असल्याचे दर्शवून आठ टप्प्याचे प्रवासी भाडे आकारल्या जात होते. गत अनेक वर्षांपासून ही बस वायगाव बसस्थानकावर न जाता वायगाव चौरस्ता मार्गे वर्धा बस स्थानकावर पोहचते. या मार्गे हिंगणघाट बस स्थानकातील फलाटापासून नंदोरी चौक वणा नदी पूल, धोत्रा चौरस्ता, वायगाव चौरस्ता मार्गे वर्धा बस स्थानकावरील फलाटापर्यंतचे अंतर ४१ किमी आहे. प्रती सहा किमी अंतराचा एक टप्पा या प्रमाणे सात टप्याच्या ४२ किमीच्या आंत दोन्ही बस स्थानक येत आहे; परंतु बस भाडे मात्र आजही आठ टप्प्याचे वसूल केल्या जात आहे. हिंगणघाट -जाम मार्गावरही तोच प्रकार हिंगणघाट जाम चौरस्ता प्रवासी अंतर १२ किमीच्या आत असताना जुने बसस्थानक ते जाम चौरस्ता बस स्थानकापर्यंतचे अंतर १२.९ की. मी. असल्याचे दर्शवून दोन टप्प्यांऐवजी अडीच टप्प्याच्या बस भाड्याची वसूली केली जात आहे. हिंगणघाटवरुन नागपूर, चंद्रपूर, हैदराबाद, पांढरकवडा, गिरड, उमरेडकडे आवागमन करणाऱ्या ३१७ बस फेरीद्वारे जाम चौरस्ता पर्यत प्रवास करून इतरत्र आवागमन करणाऱ्यांची संख्या दररोज जवळपास अडीच हजार आहे. अशास्थीतीत प्रती प्रवासी तीन रुपये प्रमाणे दररोज साडे सात हजार तर वर्षाला अंदाजे ३० लाखांची अतिरिक्त प्रवासी भाडे वसुली या मार्गावर राज्य परिवहन महामंडळाकडून होत आहे. या दोन्ही मार्गाची अंतर मोजणी आता कालबाह्य झाली असून नव्याने अंतर मोजणी अत्यावश्यक आहे.