शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वाहनांमध्ये तीव्र फोकस लाईटचा नियमबाह्य वापर

By admin | Updated: July 6, 2015 02:18 IST

शहरातील वाहनांची वाढती संख्या बघता प्रत्येक जण आपल्या वाहनात काही वेगळे असावे याकडे लक्ष देतात.

अपघाताची शक्यता : वाहतूक विभागाने कारवाई करण्याची मागणीवर्धा : शहरातील वाहनांची वाढती संख्या बघता प्रत्येक जण आपल्या वाहनात काही वेगळे असावे याकडे लक्ष देतात. याच हेतूने अनेक जण नियमांचे उल्लंघन करून डोळे दिपविणारे पांढरे हेडलाईट लावत आहेत. परंतु ते इतरांसाठी जीवघेणे ठरत आहेत. रात्रीच्या अंधारात समोरून येणाऱ्या वाहनाचे पांढरे हेडलाईट डोळ्यावर पडल्याने अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु असे लाईट्स असलेली वाहने शहरात सर्रास धावत असतानाही या वाहनांवर अद्यापही कारवाई होताना दिसत नाही. शहरात दिवसभर हजारो वाहनांची वर्दळ सुरू असते. तसेच काही अन्य शहरातील वाहनेसुद्धा शहरात दाखल होतात. यामध्ये काही वाहनांना प्रखर असे पांढरे हेडलाईट असल्याचे निदर्शनास येते. पांढरा प्रकाश समोरून येणाऱ्या वाहन चालकांच्या डोळयावर पडत असल्याने वाहन चालकांना काहीच दिसत नसल्याने जागीच थांबावे लागते. अशावेळी अपघातही होतात. या प्रकारच्या घटनांमध्ये नागरिक तक्रारसुद्धा करीत नाही. अपघात होताच वाहन चालक पळूनही जातात. म्हणून या प्रकारचा उलगडा होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे इतर वाहनचालक नेहमीच नाराजी व्यक्त करीत असतात.शहरामध्ये आलेली बाहेरील वाहने तसेच शहरामधील काही विद्यार्थी मोटारसायकलीला सर्रासपणे पांढरे हेडलाईट लावत आहेत. असे असतानाही वाहतूक शाखेकडून अद्यापही अशा कोणत्याही वाहनावर कारवाई झाल्याचे अद्याप निदर्शनास आलेले नाही. वाहनांना असणाऱ्या पांढऱ्या हेडलाईटमुळे पडणाऱ्या तीव प्रकाशाने डोळ्यापुढे अंधारी येते. तसेच मोतीबिंदु असणाऱ्यांनाही त्रास होतो. पांढऱ्या हेडलाईटमुळे समोरून येणारे वाहन चालक दचकतात. अशा प्रसंगी अपघात घडण्याची शक्यता अधिक असते. वाहतूक शाखेने याची गांभिर्याने दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.(शहर प्रतिनिधी)