शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
2
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
3
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
4
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
5
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
6
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
7
५ राजयोगात मार्गशीर्ष अमावास्या २०२५: ९ राशींवर लक्ष्मी कुबेर कृपा, कल्पनेपलीकडे यश-पैसा-लाभ!
8
Creta ला टक्कर देण्यासाठी येतेय Mahindra ची नवी 'मिड-साईज' SUV; असे असेल डिझाईन अन् खासियत
9
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
10
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: वर्षातली शेवटची आणि प्रभावशाली रात्र; आठवणीने करा 'हे' ५ उपाय!
11
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
12
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
14
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
15
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
16
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
17
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
18
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
19
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
20
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील पर्यटन विकासासाठी भरगच्च तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 13:18 IST

पर्यटनस्थळाच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळास राज्य सरकारकडून सन २०१६-१७ मध्ये मोठ्या प्रमाणात निधी वितरित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसर्वच जिल्ह्यांना निधी १६०० कोटीपैकी ९७२८ लक्ष रूपये वितरित

आॅनलाईन लोकमतवर्धा : पर्यटनस्थळाच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळास राज्य सरकारकडून सन २०१६-१७ मध्ये मोठ्या प्रमाणात निधी वितरित करण्यात आला आहे. यातून विदर्भाच्या पर्यटन विकासाला चालना मिळेल. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांचा या आराखड्यात समावेश आहे.पर्यटन स्थळाच्या क्षेत्रात पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत सन २०१६-१७ मध्ये २०० कोटी इतक्या निधीचे नियतव्यय अर्थसंकल्पित करण्यात आले होते. त्यापैकी ८० टक्के रक्कम म्हणजे १६० कोटी रूपये वितरणास उपलब्ध झाले. त्यानंतरही विविध पर्यटन क्षेत्रासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यात विदर्भात वर्धा जिल्ह्याच्या केळझर येथील विकासासाठी तसेच नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा तालुक्यातील रायपूर, वेणा नदी, अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथील मोझरी पॉर्इंट, हॉलिडे रिसॉर्ट व साहसी क्रीडा संकूल उभारणी या शिवाय यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी तालुक्यातील बोरगाव येथे भंडारा जिल्ह्याच्या चांदपूर, गायमुख, चंद्रपूर जिल्ह्याच्या ताडोबा (मोहर्ली) येथील पर्यटन निवासाच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. याशिवाय यवतमाळ जिल्ह्याच्या कळंब, उमरखेड तालुक्यातील सहस्त्रकुंड, टिपेश्वर, संकटमोचन तलाव, वर्धा जिल्ह्यातील बोरधरण आदी ठिकाणीही या निधीतून विविध पर्यटन सोयी निर्माण केल्या जाणार आहेत. याशिवाय धुळे जिल्ह्यात वर्णेश्वर शिवमंदिर, जुने कोळदे, प्राचीन काली मंदिर, मेथी ता. शिंदखेड, विखरण, चामुंडेश्वरी माता मंदिर आदीच्या विकासासाठी तरतूद करण्यात आली आहे. औरंगाबाद, रायगड, ठाणे, कोल्हापूर, नाशिक येथीलही पर्यटन विकासाच्या कामांचा यात समावेश आहे.केळझरात साधला जाणार त्रिवेणी संगमविदर्भाचा अष्टविनायक म्हणून प्रसिध्द असलेल्या सिध्दीविनायक गणेश मंदिराच्या केळझर नगरीत पर्यटन विकास महामंडळाने हजरत पीर बाबा टेकडी,डॉ. बाबासाहेब आंबेडकर धम्मभूमी व सिध्दीविनायक परिसर विकास कामासाठी ४९५ कोटी रूपयाचा निधी उपलब्ध केला आहे. यातून हिंदू, मुस्लीम, बौध्द या तीनही धर्माच्या स्थळांशी निगडीत परिसराचा विकास होणार आहे. या भागातून समृध्दी महामार्ग व राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने या परिसराच्या पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.

टॅग्स :tourismपर्यटन