शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

भूविकास बँकेच्या कर्ज परतफेड योजनेस मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 23:47 IST

महाराष्ट्र शासनाने भूविकास बँकेच्या थकबाकीदार सभासदांसाठी एक रकमी कर्ज परतफेड योजनेस ३१ मार्च २०१९ पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळे भूविकास बँकेच्या थकबाकीदार सभासदांना योजनेनुसार त्यांच्याकडील असलेल्या वसुलपात्र मुद्दल त्यावर ६ टक्के सरळ व्याज ...........

ठळक मुद्देजिल्हा उपनिबंधकाची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र शासनाने भूविकास बँकेच्या थकबाकीदार सभासदांसाठी एक रकमी कर्ज परतफेड योजनेस ३१ मार्च २०१९ पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळे भूविकास बँकेच्या थकबाकीदार सभासदांना योजनेनुसार त्यांच्याकडील असलेल्या वसुलपात्र मुद्दल त्यावर ६ टक्के सरळ व्याज रकमेचा भरणा करून खाते बंद करण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे, अशी माहिती अवसायक वर्धा जिल्हा कृषी ग्रामीण बहुविकास बँक मर्यादित वर्धा तथा जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे यांनी दिली आहे.वालदे यांनी म्हटले आहे की, सदर योजनेत आजतागायत १३१ सभासदांनी रू. ८३.३५ लाख रक्कमेची भरणा करून त्यांना शासनाकडून ५४.८१ लाख रकमेची सवलत मिळाली आहे. अद्यापही ३५८ सभासद व सवलतीपासून वंचित आहेत. सदर योजनेंतर्गत सवलतीमध्ये कर्ज खाते बंद करण्याची मुदत ३१ मार्च पर्यंत आहे. त्यामुळे थकबाकीदार शेतकरी सभासदांनी शासनाच्या सदर ओटीएस योजनेत त्याच्याकडील थकीत कर्जाचा भरणा बँकेच्या मुख्य कार्यालयात वर्धा येथे अंतीम मुदतीपूर्वी करून या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा, असे जाहीर आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, वर्धा तथा अवसायक गौतम वालदे यांनी केले आहे.मुदतीनंतर सदर थकीत कर्जाची रक्कम महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील तरतुदीनुसार सक्तीने वसुल केली जाणार असल्यामुळे सदर योजनेपासून वंचित असलेल्या शेतकरी सभासदांनी बँकेच्या वर्धा येथील मुख्य कार्यालयास संपर्क साधून ओटीएस योजनेत कर्जाचा भरणा करून कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन भूविकास बॅक व्यवस्थापनाने केले आहे.बँकेचे व्यवहार ठप्पराज्यातील बहुतांश भूविकास बँकांचा व्यवहार ठप्प झाला आहे. या बँका शासनाने अवसायानात काढल्या असल्याने त्याचे कर्ज भरण्यास कर्जदार शेतकरी तयार होत नाही. त्यामुळे शासनाने ही योजना जाहीर केली आहे.