शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

कापसाच्या ९० लाख गाठींची चीनला निर्यात करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 06:00 IST

अमेरिका दरवर्षी चीनला ६० लाख कापसाच्या गाठींची निर्यात करीत होता; पण अमेरिका आणि चीनच्या व्यापार युद्धामुळे अमेरिकेकडून ही निर्यात थांबली आहे. यावर्षी चीनमध्ये ३५५ लाख गाठींचे उत्पादन झाले आहे. ते उत्पादन दरवर्षीपेक्षा ६० लाख गाठींनी कमी आहे. चीनमधील वस्त्रोद्योग जगविख्यात असल्याने चीनला ६०० लाख गाठींची आवश्यकता आहे. त्यामुळे चीन आता विदेशातून २४५ लाख गाठींची आयात करणार आहे.

ठळक मुद्देकृषीतज्ज्ञांनी पाठविले पंतप्रधानांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भारतामध्ये यावर्षी ३३० लाख गाठींचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. त्यापैकी भारताला २४० कापसाच्या गाठींची गरज असून ९० लाख गाठी निर्यातीकरिता उपलब्ध राहणार आहेत. देशात कापसाच्या गाठींचे उत्पादन जास्त होणार असल्याच्या कारणाने खुल्या बाजारात कापसाचे दर हमीभावापेक्षी कमी आहे. त्यामुळे कापसाचे दर वाढून कापूस उत्पादकांना दिलासा देण्याकरिता देशातील ९० लाख कापसाच्या गाठींची चीनला निर्यात करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे सदस्य तथा महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे उपाध्यक्ष प्रशांत इंगळे तिगावकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे.अमेरिका दरवर्षी चीनला ६० लाख कापसाच्या गाठींची निर्यात करीत होता; पण अमेरिका आणि चीनच्या व्यापार युद्धामुळे अमेरिकेकडून ही निर्यात थांबली आहे. यावर्षी चीनमध्ये ३५५ लाख गाठींचे उत्पादन झाले आहे. ते उत्पादन दरवर्षीपेक्षा ६० लाख गाठींनी कमी आहे.चीनमधील वस्त्रोद्योग जगविख्यात असल्याने चीनला ६०० लाख गाठींची आवश्यकता आहे. त्यामुळे चीन आता विदेशातून २४५ लाख गाठींची आयात करणार आहे. त्यामुळे चीनचे राष्ट्रपती शि. जिनपिंग आणि भारत देशाचे संबंध चांगले असल्याने आपल्याकडील अतिरिक्त ९० लाख गाठी चीनला निर्यात करण्यासंदर्भात दहा वर्षांकरिता दीर्घकालीन करार केल्यास कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ५ हजार ५५० रुपयांच्या हमीभावापेक्षा जास्त दर मिळणार आहे. त्यामुळे येथील कापूस उत्पादकांना मोठा आधार मिळेल, असेही प्रशांत इंगळे तिगांवकर यांनी पत्रात नमूद केले आहे.चीनकडूनही भारतातील कापसाला मागणीचीनचे अमेरिकेशी संबंध बिघडल्याने आता कापसाकरिता चीनने भारताकडे मागणी केली आहे. त्यामुळे भारतानेही या मागणीचा विचार करून ९० लाख गाठींची निर्यात करावी. निर्यात केल्यास शेतकऱ्यांच्या कापसाला जास्त दर मिळणार असून कापूस उत्पादकांना न्याय मिळेल, असेही पत्रात नमूद केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार रामदास तडस यांनाही पत्र दिले आहे.

टॅग्स :agricultureशेती