शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

चोरीच्या पैशातून खरेदी केली महागडी कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 23:27 IST

अल्लीपूर पोलीस ठाण्यात त्रिनेव्हा इफ्रा. प्रोजेक्ट कंपनीतील रोखपाल आनंदन ए. शिवकुमार यांच्या तक्रारीवरून दाखल केलेल्या गुन्ह्याचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील आरोपी उमेश विनायक चव्हान याला पोलिसांनी समुद्रपूर येथून अटक केली आहे.

ठळक मुद्देचोरटा अटकेत । त्रिनेव्हा इन्फ्रा. प्रोजेक्ट कंपनीतील चोरीप्रकरण, ८७ हजारांची रोख जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कअल्लीपूर : अल्लीपूर पोलीस ठाण्यात त्रिनेव्हा इफ्रा. प्रोजेक्ट कंपनीतील रोखपाल आनंदन ए. शिवकुमार यांच्या तक्रारीवरून दाखल केलेल्या गुन्ह्याचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील आरोपी उमेश विनायक चव्हान याला पोलिसांनी समुद्रपूर येथून अटक केली आहे. त्याने चोरीच्या पैशातून एक कार खरेदी केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.कंपनीच्या कपाटातून चोरट्याने रोख पाच लाख रुपये चोरून नेल्याची तक्रार अल्लीपूर पोलीस ठाण्यात दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरूद्ध भादंविच्या कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासून अल्लीपूर व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस समांतर तपास करीत होते. दरम्यान खात्रीदायक माहितीच्या आधारे उमेश चव्हान याला समुद्रपूर येथून ताब्यात घेण्यात आले. त्याने गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे. शिवाय चोरीच्या पैशातून एक कार खरेदी करीत इतर पैसे जवळ असल्याचे पोलिसांना सांगितले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एम. एच. ३१ सी. एम. ६३२७ क्रमांकाची कार व रोख ८७ हजार रुपये जप्त केले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक पंकज पवार, स.फौ. सलाम कुरेशी, पोहवा. स्वप्निल भारव्दाज, मनीष श्रीवास, कुणाल हिवसे, जगदिश डफ, प्रदिप वाघ, आत्माराम भोयर यांनी केली.बौद्धविहारातील दानपेटी फोडलीकेळझर : येथील बुद्धविहारातील दोन दानपेट्या अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यातील रोख लांबविल्याची घटना शुक्रवारच्या रात्री घडली. शनिवारी पहाटे सदर घटना उघडकीस आल्याने भन्ते देवमित्र यांनी याबाबतची तक्रार सेलू पोलिसात दिली आहे. घटनास्थळी श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. चोरट्यांनी बुद्धविहारातील दानपेटी काही अंतरावर नेत फोडल्या. शिवाय त्यातील रोख रक्कम घेऊन घटनास्थळावरून यशस्वी पळ काढला. सदर दोन्ही दानपेटीत सुमारे २२ हजार रुपये असल्याचा अंदाज तक्रारीतून वर्तविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. चार महिन्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात सुद्धा अशाच पद्धतीने चोरट्यांनी दानपेटी पळवून नेली होती. तेव्हाही चोरटे गवसले नव्हते, हे विशेष.

टॅग्स :Thiefचोर