लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागात सतत थांबून थांबून पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक शेतशिवारांना तळ्याचे स्वरूप आले आहे. सध्या कापूस फुलावर तर सोयाबीन पीक शेंग भरण्याच्या स्थितीत आहे. परंतु, सततच्या पावसाचा या उभ्या पिकांना चांगलाच फटका बसत असून यंदा उत्पादनात घट येण्याची शक्यता वयोवृद्ध शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. पावसाळ्याच्या सुरूवातीला वरुणराजा रुसला होता; पण त्यानंतर समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची कामे पूर्ण केली. शिवाय पिकांची चांगली निगा राखल्याने पिकांची वाढही बऱ्यांपैकी झाली.परंतु, सध्या ढगाळी वातावरण आणि थांबून थांबून येत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदतीची अपेक्षा आहे.भाजीपालावर्गीय पिकांना फटकाचिकणी (जामणी) : मागील चार वर्षांच्या तुलनेमध्ये यंदा उशीराका होईल ना पण दमदार पाऊस परिसरात झाला. सुरूवातीला पावसाने दगा दिल्याने यंदा कोरड्या दुष्काळाला सामोरे जावे लागेल असा अंदाज वर्तविला जात होता. परंतु, नंतर झालेल्या पावसामुळे शेतकºयांनी पेरणीची कामे पूर्ण केली. या परिसरात मोठ्या प्रमाणात भाजीपालावर्गीय पिकाचे उत्पादन शेतकरी घेतात. परंतु, मागील आठ दिवसांपासून सतत थांबून थांबून सुरू असलेल्या पावसाचा सोयाबीन, तूर, कपाशीसह भाजीपालावर्गीय पिकांना चांगलाच फटका बसला आहे. पावसाळ्याच्या सुरूवातीला अंकुरलेले पीक जगतील की नाही असा प्रश्न शेतकºयांना पडला होता. परंतु, त्यानंतर झालेला पाऊस पिकांसाठी नवसंजीवनी ठरला. पण सध्या सततच्या पावसामुळे उभ्या पिकांवर विपरीत परिणाम होत आहेत. चिकणी सह परिसरामध्ये भाजीपाला पिकांची लागवड केल्या जाते.यावर्षीही करण्यात आली; पण सततच्या पावसामुळे वांगी, टमाटे, भेंडी, गवार आदी भाजीपालावर्गीय पीक खराब होत आहे. अशातच भाजीपाल्याचे दरही चांगलेच कडाडले आहे. या भागातील अनेक शेतकºयांना यंदा बँकांनी पीक कर्ज देण्यास टाळाटाळच केली. परिणामी शेतकºयांनी उसनवारीने आलेल्या पैशाच्या भरवश्यावर शेती फुलविली. परंतु, सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे तूर, कपाशी, सोयाबीनसह भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची कंबर्डे मोडले आहे.सततच्या पावसामुळे सोयाबीन उत्पादकांच्या अडचणीत भरआर्वी : दसºयानंतर सोयाबीन पीक कापणीचा हंगाम सुरू होतो. येत्या काही दिवसांवर आता दसरा हा सण येऊन ठेपला असला तरी सध्या परिसरात ढगाळी वातावरण आहे. इतकेच नव्हे तर थांबून थांबून परिसरात मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकºयांचया अडचणीत भर पडली आहे. मागील एक महिन्यांपासून पाहिले तशी ऊन पडत नसल्याने अजूनही शेत शिवारांमध्ये चिखल कायम असल्याचे दिसून येते. तर काही शेत शिवारांना सततच्या पावसामुळे तळ्याचे स्वरूप आले आहे. सूर्यप्रकाशाअभावी सोसाबीनच्या शेंगा पाहिले त्या प्रमाणात भरल्या नसल्याचे वास्तव सध्या बघावसाय मिळत आहे. तालुक्यातील वाठोडा, वागदा, अहिरवाडा, निंबोली (शेंडे), राजापूर, देऊरवाडा, सर्कसपूर, इठलापूर, रोटा, लाडेंगांव, नांदपूर, माटोडा, शिरपूर, जळगांव, वर्धनमेर, मांडला, सावळपासूर, वाढोणा, पिंपळखूट, गुमगांव, दहेगाव, पाचेगांव, रोहणा, साळफळ, वडगांव, नांदोरा, खुबगांव, पाचोड, चिंचाली (डांगे) व कवाडी आदी गावातील शेतकºयांची सध्या सततच्या पावसाने चांगलीच अडचण वाढविली आहे.नदी अन् नाल्याकाठचे शेतकरी आले मेटाकुटीसअल्लीपूर : सध्या परिसरातील नदी व नाल्या शेजारी शेतजमीन असलेले शेतकरी चांगलेच मेटाकुटीस आले आहे. सततच्या पावसादरम्यान पुराचे पाणी थेट शेतात शिरत असल्याने उभ्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. शिवाय अनेक शेतांना तळ्याचे स्वरूप येत असल्याचे बघावयास मिळत आहे. त्यामुळे शेतकºयांच्या अडचणीत भर पडली आहे. पावसामुळे सोयाबीन पीक धोक्यात आले असून यंदा एकरभºयात मुठभर सोयाबीन तरी होईल काय, असा प्रश्न शेतकºयांना सतावत आहे. तर कपाशीचे पिकावर बुरशी जन्य आजाराचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सोयाबीन, तूर व कपाशी उत्पादक शेतकºयांची समस्या लक्षात घेता कृषी विभागाने शेतकºयांना वेळीच मार्गदर्शन करण्याची मागणी आहे.कारंजा तालुक्यात पीक परिस्थिती नाजूककारंजा (घा.) : कारंजा तालुक्यात यावर्षी अती पाऊस झाला आहे. गत ४० वर्षांच्या तुलनेत यंदा पावसाची विक्रमी नोंद घेण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे बळीराजा मेटाकुटीस आला आहे. यंदा ओल्या दुष्काळाला सामोरे जावे लागेल असे वयोवृद्ध शेतकरी सांगतात. तालुक्यात २७ सप्टेंबरपर्यंत एकूण ८६२.८ कि़मी. पावसाची नोंद घेण्यात आली आहे. हा आकडा मागील वर्षीच्या सरासरी पेक्षा २० टक्के जादा आहे. तालुक्यातील नदी, नाले सध्या दुथडी भरून वाहत आहेत. तर विहिरींच्या पाणी पातळीतही बºयापैकी वाढ झाली आहे. सध्या शेतकरी हवालदील झाला असून राजकीय पुढाºयांना त्यांच्या समस्या दिसत नसल्याने शेतकºयांमध्ये रोष निर्माण होत आहे. इतकेच नव्हे तर अतिवृष्टीमुळे तालुक्यात किती नुकसान झाले याची जूळवाजूळव अजूनही तालुका प्रशासन करीत आहे. बँकांच्या दुर्लक्षीत धोरणामुळे अनेक शेतकºयांना यंदा पीक कर्ज मिळाले नाही. उसनवारी आणि नातेवाईकांकडून पैसे उधार घेऊन तालुक्यातील अनेक शेतकºयांनी शेत जमीन कसल्याचे वास्तव आहे. सततच्या पावसामुळे विविध पिकांच्या झाडांचे मुळ कुजत आहे. याचाच परिणाम उत्पादनावर पडेल असे शेतकरी सांगतात. तालुक्यातील सोयाबीन, तूर व कापूस पीक सध्या आॅक्सिजनवर असल्याचे दिसून येत आहे. सततच्या पावसामुळे संत्रा झाडांचा बार गळत आहे. येत्या काही दिवसात चांगली उघाड पडत ऊन तापल्यास पिकांना नवसंजीवनीच मिळेल, असे ही शेतकरी सांगतात.
अतिवृष्टी ठरतेय नुकसानीची टांगती तलवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 05:00 IST
सततच्या पावसाचा या उभ्या पिकांना चांगलाच फटका बसत असून यंदा उत्पादनात घट येण्याची शक्यता वयोवृद्ध शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. पावसाळ्याच्या सुरूवातीला वरुणराजा रुसला होता; पण त्यानंतर समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची कामे पूर्ण केली. शिवाय पिकांची चांगली निगा राखल्याने पिकांची वाढही बऱ्यांपैकी झाली.
अतिवृष्टी ठरतेय नुकसानीची टांगती तलवार
ठळक मुद्देतूर, सोयाबीन, कपाशी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर : उत्पादनात घट येण्याची शक्यता